नागपुरात पहिल्या बाल असंसर्गजन्य आजार प्रतिबंधासाठी ‘करार’; युनिसेफचा मोलाचा वाटा

By सुमेध वाघमार | Updated: April 10, 2026 20:08 IST2026-04-10T20:07:49+5:302026-04-10T20:08:23+5:30

Nagpur : राज्यातील बालकांमधील वाढत्या असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर सोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे.

First 'Agreement' for prevention of childhood non-communicable diseases in Nagpur; UNICEF plays a valuable role | नागपुरात पहिल्या बाल असंसर्गजन्य आजार प्रतिबंधासाठी ‘करार’; युनिसेफचा मोलाचा वाटा

First 'Agreement' for prevention of childhood non-communicable diseases in Nagpur; UNICEF plays a valuable role

सुमेध वाघमारे 
नागपूर :
राज्यातील बालकांमधील वाढत्या असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर सोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. यामुळे बालपणातील स्थूलता, टाइप-१ मधुमेह आणि दमा यांसारख्या गंभीर आजारांच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनाला मोठी बळकटी मिळणार आहे.

मुंबईतील आरोग्य भवन येथे हा करार पार पडला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार नाना पाटोले, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बालकवडे आणि युनिसेफ महाराष्ट्रचे प्रमुख संजय सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाला युनिसेफकडून धोरणात्मक आणि तांत्रिक सहाय्य लाभणार आहे.

'एम्स' नागपूरकडे तांत्रिक नेतृत्वाची धुरा

या करारांतर्गत 'एम्स' नागपूर हे मुख्य तांत्रिक केंद्र म्हणून कार्य करेल. ‘एम्स’चे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले की, या करारामुळे तज्ज्ञ वैद्यकीय ज्ञानाचे थेट सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत रूपांतर होऊन तळागाळातील रुग्णांना त्याचा लाभ मिळेल.

युनिसेफचा मोलाचा वाटा

युनिसेफचे संजय सिंग यांनी स्पष्ट केले की, शासन आणि वैद्यकीय संस्थांना एकत्र आणून बालकांसाठी शाश्वत आरोग्य व्यवस्था उभी करणे ही काळाची गरज आहे. बालपणातच या आजारांवर नियंत्रण मिळवल्यास भविष्यातील मोठे आरोग्य संकट आणि आर्थिक भार टाळता येणे शक्य होईल.

करारामुळे आरोग्य व्यवस्थेत होतील बदल 

  • सहा प्रमुख आजारांवर लक्ष: टाइप-१ मधुमेह, दमा, स्थूलता, मानसिक आरोग्य, जन्मजात हृदयविकार आणि सिकल सेल या सहा आजारांसाठी विशेष उपचार प्रोटोकॉल विकसित केले आहेत.
  • १० जिल्ह्यांत विशेष क्लिनिक : प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील १० जिल्हा रुग्णालयांमध्ये खास बाल असंसर्गजन्य आजार क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत.
  • प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी: प्रमुख जिल्ह्यांमधील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाºयांना या आजारांच्या आधुनिक उपचारांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
  • तपासणी यंत्रणा बळकट करणार: गाव आणि समुदाय स्तरावर मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून त्यांना पुढील उपचारांसाठी त्वरित संदर्भ देणारी यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल.

Web Title : यूनिसेफ के समर्थन से नागपुर में बचपन के गैर-संक्रामक रोगों से मुकाबला।

Web Summary : महाराष्ट्र का स्वास्थ्य विभाग और एम्स नागपुर, यूनिसेफ के साथ मिलकर बचपन के मोटापे, मधुमेह और अस्थमा से मुकाबला करेंगे। इस पहल के तहत 10 जिलों में विशेष क्लीनिक स्थापित किए जाएंगे, स्वास्थ्य कर्मचारियों को प्रशिक्षित किया जाएगा, और बेहतर बाल स्वास्थ्य के लिए शीघ्र पहचान को मजबूत किया जाएगा।

Web Title : Nagpur to combat childhood non-communicable diseases with UNICEF support.

Web Summary : Maharashtra's health department and AIIMS Nagpur collaborate with UNICEF to combat childhood obesity, diabetes, and asthma. The initiative establishes specialized clinics in 10 districts, trains healthcare staff, and strengthens early detection for improved child health.