शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

नागपुरात कुख्यात पिन्नू पांडेवर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:12 PM

गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वैमनस्याचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगारावर गोळीबार करण्यात झाले. दुचाकीवर आलेल्या गुंडांनी कुख्यात पिन्नू पांडेवर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पिन्नूच्या मांडीला लागली. तर, दोन गोळ्या अन्य दोघांना लागल्या. त्यातील एका जखमीचे नाव मोहनलाल धुरिया आहे. तिसऱ्या जखमीचे नाव स्पष्ट होऊ शकले नाही. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेन्शननगर चौकात मंगळवारी सायंकाळी ४.३० ते ५ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपाच गोळ्या झाडल्या : पिन्नूसह तिघे जखमी : गिट्टीखदानमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वैमनस्याचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगारावर गोळीबार करण्यात झाले. दुचाकीवर आलेल्या गुंडांनी कुख्यात पिन्नू पांडेवर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पिन्नूच्या मांडीला लागली. तर, दोन गोळ्या अन्य दोघांना लागल्या. त्यातील एका जखमीचे नाव मोहनलाल धुरिया आहे. तिसऱ्या जखमीचे नाव स्पष्ट होऊ शकले नाही. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेन्शननगर चौकात मंगळवारी सायंकाळी ४.३० ते ५ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.जखमी पिन्नू पांडे हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहरातील अनेक गुन्हेगारांसोबत त्याचे वैमनस्य आहे. त्यांच्यात वाद, हल्लेही झालेले आहे. काही दिवसांपूर्वीच पिन्नू कारागृहातून बाहेर आला. मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पिन्नू पेन्शननगर चौकातील अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएमसमोर साथीदारांसह उभा होता. तेवढ्यात दुचाकीवर आलेल्या दोघांनी पिन्नूच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पिन्नूच्या जांघेत लागली. त्यामुळे तो खाली पडला. दुसरी एक गोळी तेथून जात असलेल्या धुरिया नामक व्यक्तीला लागली. त्यामुळे पिन्नूसोबत धुरियादेखील गंभीर जखमी झाला. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच गिट्टीखदान तसेच गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा तिकडे धावला. पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनीही घटनास्थळी आणि नंतर पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तोपर्यंत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तीन दिवसांपासून भांडण सुरूगोळीबार नेमका कुणी केला. ते रात्री ९ वाजतापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र, शहरातील कुख्यात गुंड सुमित ठाकूर याच्या सांगण्यावरून त्याच्या हस्तकांनी गोळ्या झाडल्या असाव्या, असा संशय आहे. कुख्यात पिन्नू पांडेसोबत सुमित ठाकूरचा गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यांनी एकमेकांवर यापूर्वी हल्लेदेखील केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून सादिक आणि साजीद नामक गुंडांसोबत पिन्नूचा फोनवर वाद सुरू होता. एकमेकांना धमक्या आणि पाहून घेण्याची भाषाही वापरण्यात आली होती. सुमितलाही शिवीगाळ झाली होती. या पार्श्वभूमीवर, सुमितचे साथीदार असलेल्या सादिक, साजीद, मोहसिन आणि ईरफान चाचू या गुंडांनी पिन्नूचा गेम करण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्याचे सांगितले जाते. मात्र, नेम चुकल्याने पाचपैकी एकच गोळी पिन्नूच्या मांडीवर लागली. त्यामुळे तो तसेच धुरिया आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाले. तिसºया जखमीचे नाव वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.दोन दुचाक्या, चार आरोपीगिट्टीखदानचे ठाणेदार राजकमल वाघमारे यांनी आपल्या सहकाºयांसह आरोपीच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहे. दोन दुचाक्यांवर चार आरोपी होते, असा पोलिसांना संशय आहे. त्यातील दोन आरोपी आधी मोटरसायकलवर आले. त्यांनी पिन्नू कुठे आहे, त्याची शहानिशा करून घेतली. त्यानंतर काही वेळाने अ‍ॅक्टीव्हावर आलेल्या दोघांनी नवनीत बारच्या बाजूला असलेल्या एटीएमजवळ गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत. तर, हा हल्ला सुमित ठाकूरच्या सांगण्यावरूनच त्याच्या गुंड साथीदारांनी केल्याचे पिन्नू यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.पिन्नूची पार्श्वभूमी वादग्रस्तगोळीबारात जखमी झालेल्या पिन्नू पांडेची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार महिन्यांपूर्वी त्याच्या हाताला गोळी लागली होती. चुकून गोळी सुटली, हाताला लागली, अशी माहिती त्यावेळी पिन्नूने दिली होती. त्याच्या पत्नीनेही त्यावेळी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पिन्नूवरील गुन्हेगारी अहवाल एकत्र करून पोलिसांनी त्याच्या हद्दपारीची फाईल तयार केली आहे. काही दिवसांतच तसा आदेश निघणार आहे. दुसरीकडे सुमित ठाकूरविरुद्ध यापूर्वी मोक्का, हद्दपारी, अशा कारवाई झाल्या आहेत. तो सध्या वर्धा येथे असल्याची गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपींचा छडा लागला नव्हता. 

 

टॅग्स :Firingगोळीबारnagpurनागपूर