नागपुरात कुख्यात गुंड लकी खानवर फायरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:53 IST2019-07-03T00:52:48+5:302019-07-03T00:53:46+5:30
कुख्यात गुंड लकी खान याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुडांनी गोळी झाडल्याचे वृत्त आहे. मंगळवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास मानकापुरात ही घटना घडल्याचे समजते.

नागपुरात कुख्यात गुंड लकी खानवर फायरिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड लकी खान याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुडांनी गोळी झाडल्याचे वृत्त आहे. मंगळवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास मानकापुरात ही घटना घडल्याचे समजते.
नागपूर शहरातील गुन्हेगारी जगतात मांडवलीचा प्रमूख मानला जाणारा सुभाष शाहू याची प्रसादातून सायनार्ईड खाऊ घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात गुन्हे शाखेने लकीला अटक केली होती. तेव्हापासून तो गुन्हेगारी जगतात आणि पोलिसांच्याही रेकॉर्डवर आला होता. त्याच्यावर मंगळवारी मध्यरात्री मानकापूर चौकात फायरिंग झाल्याचे वृत्त पसरल्याने परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. मानकापूर तसेच गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे स्पष्ट झाली नव्हती. जखमी लकीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीस सांगत होते.