नागपुरातील टिमकीत हवेत गोळीबाराने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:57 IST2018-07-07T00:55:37+5:302018-07-07T00:57:26+5:30

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भानखेडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री दोन गटात जोरदार वाद झाला. एका गटाने छर्र्याच्या बंदुकीतून हवेत गोळी (छर्रा) झाडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

Firing in air in Timki Nagpur | नागपुरातील टिमकीत हवेत गोळीबाराने खळबळ

नागपुरातील टिमकीत हवेत गोळीबाराने खळबळ

ठळक मुद्देमध्यरात्री घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भानखेडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री दोन गटात जोरदार वाद झाला. एका गटाने छर्र्याच्या बंदुकीतून हवेत गोळी (छर्रा) झाडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
टिमकी भानखेडा परिसरातील दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्री त्यांच्यात पुन्हा शाब्दीक चकमक झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने वाद वाढला. एका गटाने बंदूकीतून हवेत छर्रा झाडला. त्यानंतर सारेच पळून गेले. दरम्यान, गोळीबार झाल्याची सर्वत्र वार्ता पसरली. त्यामुळे तहसील पोलीसही भानखेड्यात पोहचले. या संबंधाने परिसरात विचारणा केली असता फायरिंग झाले असे कुणीच सांगितले नाही, असे तहसील पोलिसांनी सांगितले.

Web Title: Firing in air in Timki Nagpur