शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

रविवारी अग्निशमन सेवा दिन : वर्षभरात १ हजार ७६ कोटींची मालमत्ता वाचविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 8:36 PM

नागपूर शहर व परिसरात गेल्या वर्षभरात ११९२ आगीच्या घटना घडल्या. यात १५२ मोठ्या आगी, २८६ मध्यम तर ७५४ आगी लहान स्वरुपाच्या होत्या. लागलेल्या आगी नियंत्रणात आणून अग्निशमन विभागाच्या जवानांनी १ हजार ७६ कोटी २६ लाखांची मालमत्ता नुकसान होण्यापासून वाचविली.

ठळक मुद्देनागपुरात वर्षभरात ११९२ आगीच्या घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर व परिसरात गेल्या वर्षभरात ११९२ आगीच्या घटना घडल्या. यात १५२ मोठ्या आगी, २८६ मध्यम तर ७५४ आगी लहान स्वरुपाच्या होत्या. लागलेल्या आगी नियंत्रणात आणून अग्निशमन विभागाच्या जवानांनी १ हजार ७६ कोटी २६ लाखांची मालमत्ता नुकसान होण्यापासून वाचविली.वर्षभरात १३२ मॉकड्रीलनैसर्गिक आपत्ती, आगीपासून बचाव कसा करावा, याची नागरिकांना माहिती असल्यास नुकसान टाळणे शक्य आहे. याचा विचार करता महापालिके च्या अग्निशमन विभागातर्फे गेल्या वर्षभरात शहराच्या विविध भागात १३२ मॉकड्रील प्रशिक्षण सत्राचे आयोजन क रण्यात आले. यातून ३२ हजार ८७६ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. अग्निशमन विभागात मनुष्यबळाचा अभाव असूनही विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.मनुष्यबळाचा अभावअग्निशमन विभागात एकूण ८७२ पदे मंजूर आहेत. सध्या १५८ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. ७१४ पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाचा अभाव असूनही विभाग तत्परतेने कार्य करीत आहे. तसेच विभागाला १.९८ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात २ कोटी ६९ लाख ९६ हजारांची शुल्क वसुली करण्यात आली.शहीद जवानांना रविवारी मानवंदनालंडनहून १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई येथील गोदीत आलेल्या जहाजाला लागलेली आग विझविताना हौतात्म्य पत्करलेल्या ६६ जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी अग्निशमन सेवा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त मनपा मुख्यालय परिसरात आज रविवारी सकाळी ७ वाजता कार्यक्रम आयोजित केला आहे. यात शहिदांना अभिवादन केल्यानंतर कवायत होणार आहे.यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अग्निशमन व विद्युत सेवा समिती सभापती लहुकुमार बेहते व आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहतील.अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.वर्षभरातील दृष्टिक्षेप

  • एकूण लागलेल्या आगी : ११९२ (७५४ लहान, २८६ मध्यम, १५२ मोठ्या)
  • अंदाजे नुकसान : ३४ लाख ३८ हजार ८८५
  • मालमत्ता वाचविली : १ अब्ज, ७६ कोटी, २६ लाख ७७ हजार ६५
  • एकूण आपत्कालीन घटना : ७३९(विहीर व तलाव घटनांचा समावेश)
  • कॉल्स : १४२
  • एकूण विहिरी उपसा : ३४०५ मनपा झोनअंतर्गत उपसा,२१० खासगी विहिरी
  • एकूण मॉकड्रील : १३२

 

टॅग्स :fireआगNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका