नागपुरात सहनिबंधक कार्यालयाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:59 IST2018-03-29T00:59:40+5:302018-03-29T00:59:50+5:30
खामला येथील सहनिबंधक कार्यालयाला बुधवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कार्यालयातील दस्ताऐवज व संगणक जळून खाक झाले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

नागपुरात सहनिबंधक कार्यालयाला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खामला येथील सहनिबंधक कार्यालयाला बुधवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कार्यालयातील दस्ताऐवज व संगणक जळून खाक झाले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
खामला येथे सहनिबंधक कार्यालय क्रमांक ७ (ग्रामीण) मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी रजिस्ट्री करण्यात येते. तीन मजली इमारतीमध्ये हे कार्यालय आहे. तळमजला आणि दुसऱ्या एका मजल्यावर हे कार्यालय सुरू आहे. या कार्यालयात मागील अनेक वर्षांचा संपूर्ण दस्ताऐवज ठेवण्यात आला होता. संगणकासह महत्त्वपूर्ण दस्तावेज खचाखच भरले होते.
आगीची माहिती मिळताच काही वेळात अग्निशमन विभागाच्या नरेंद्र नगर केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आग इतकी भयानक होती की अग्निशमन कर्मचाऱ्यांना देखील आत प्रवेश करणे कठीण झाले होते. जीव धोक्यात घालून रात्री १०. १५ च्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.