अग्निशमन विभाग : नियम बदलले; एनओसीचे अर्ज आले निम्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:00 AM2020-12-22T00:00:47+5:302020-12-22T00:02:08+5:30

Fire Brigade, nagpur news राज्य सरकारने विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यासोबतच अग्निशमन विभागाकडे एनओसीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या अर्ध्यावर येण्याची शक्यता आहे. याचा विभागाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Fire Brigade: Rules changed; NOC's application came in half | अग्निशमन विभाग : नियम बदलले; एनओसीचे अर्ज आले निम्यावर

अग्निशमन विभाग : नियम बदलले; एनओसीचे अर्ज आले निम्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यासोबतच अग्निशमन विभागाकडे एनओसीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या अर्ध्यावर येण्याची शक्यता आहे. याचा विभागाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनुष्यबळ कमी असल्याने संकटाचा सामना करीत असलेल्या अग्निशमन विभागाला यामुळे थोडा दिलासाही मिळणार आहे.

नवीन नियमानुसार रहिवासी इमारत श्रेणीत आता १५ मीटर ऐवजी २५ मीटर उंचीच्या इमारतीसाठी अग्निशमन विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे. तर व्यावसायिक वापराच्या इमारतीत १५० चौ.मीटर ऐवजी ५०० चौ.मीटर भूखंड असेल तरच एनओसी घ्यावी लागणार आहे.

१ डिसेंबरपासून नागपुरात नवीन नियम लागू झाले आहे. यामुळे परवानगीसाठी अग्निशमन विभागाकडे येणाऱ्या अर्जांची संख्या कमी झाली आहे.

उंच इमारतीसाठी अग्निशमन विभागाची मंजुरी आवश्यक असते. कारण आग लागल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी व्यवस्था असणे आवश्यक असते. शहरात आतापर्यंत ७० ते ८० मीटर उंचीच्या इमारती अभ्या राहिल्या आहेत. यामुळे अग्निशमन विभागाला बळकट करण्याची गरज आहे. नागपुरात २४३ रुग्णालयांना अग्निशमन विभागातर्फे एनओसी देण्यात आली आहे.

नवीन नियमानुसार आता २४ मीटरहून अधिक उंचीच्या निवासी तर ५००चौ.मीटरहून अधिक क्षेत्रफळाच्या व्यावसायिक इमारतीसाठी अग्निशमन विभागाची परवानगी लागणार आहे. यासाठी अर्ज करावे लागतील. अशी माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

एनओसीसाठी आलेले अर्ज

 

वर्ष                 अर्ज

२०१२             १६७

२०१३             १६१

२०१४             १५६

२०१५             ११९

२०१६             १६८

२०१७             १८१

२०१८             १९९

२०१९             २७५

२०२०             १४२(नोव्हेंबरपर्यंत)

Web Title: Fire Brigade: Rules changed; NOC's application came in half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.