हिंगणा एमआयडीसीतील पेंट कंपनीला आग
By मंगेश व्यवहारे | Updated: May 23, 2024 14:07 IST2024-05-23T14:06:42+5:302024-05-23T14:07:27+5:30
Nagpur : हिंगणा परिसरातील वर्षा प्रिंटींग पेंट कंपनीला आग

Fire at paint company in Hingana MIDC
नागपूर : एमआयडीसी अग्निशमन केंद्रा अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसी हिंगणा परिसरातील वर्षा प्रिंटींग नावाने असलेल्या पेंट कंपनीला सकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी येथून १, हिंगणा २, वानाडोंगरी १, त्रिमूर्तीनगर १ असे ५ अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना झाले. पेंट कंपनी असल्याने ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीचा भडका चांगलाच उडाला होता. दुपारी १ वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले होते. सद्या अग्निशमन विभागाकडून कुलींगचे काम सुरू असून, घटनेचा अजूनही पंचनामा व्हायचा आहे. त्यामुळे आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. आगीत नुकसानीची आकडेवारी मोठी असू शकते, असे एमआयडीसी अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे.