लकडगंज आरा मशीन कारखान्याला आग, साहित्य जळून खाक

By मंगेश व्यवहारे | Updated: June 21, 2023 10:21 IST2023-06-21T10:17:32+5:302023-06-21T10:21:14+5:30

मोठ्या प्रमाणात नुकसान

Fire at Lakadganj saw machine factory, timber market in nagpur | लकडगंज आरा मशीन कारखान्याला आग, साहित्य जळून खाक

लकडगंज आरा मशीन कारखान्याला आग, साहित्य जळून खाक

नागपूरनागपूरच्या लकडगंज परिसरातील आरा मशीन (लाकडाच्या कारखान्याला) कारखान्याला मध्यरात्री आग लागली. या आगीत पाच कारखान्यातील मोठ्या प्रमाणात लाकूड जळाल्याची माहिती आहे. 3 वाजताच्या सुमारास घटनेची सूचना अग्नीशमन विभागाला मिळाली. 10 फायर टेंडर द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत किती रुपयांचे नुकसान झाले, आग कशामुळे लागली याचा पंचनामा अग्निशमन विभाग करीत आहे.

Web Title: Fire at Lakadganj saw machine factory, timber market in nagpur