हिंगणा रोडवरील अंबाझरी डायव्हर्सिटी पार्कला आग
By मंगेश व्यवहारे | Updated: May 31, 2024 15:04 IST2024-05-31T15:03:44+5:302024-05-31T15:04:22+5:30
Nagpur : आगीत अंदाजे ५ हेक्टरवरील जंगलातील गवत जळाल्याचा अंदाज

Fire at Ambazari Diversity Park on Hingana Road
नागपूर : गुरुवारी मध्यरात्री हिंगणा रोडवरील अंबाझरी डायव्हरसिटी पार्कच्या फिल्टर प्लाँटजवळ आग लागली. हा भाग जंगलाचा भाग असून, यापूर्वीही या भागात आग लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच त्रिमूर्तीनगर, सिव्हीललाईन, नरेंद्रनगर, सक्करदरा अग्निशमन केंद्राबरोबरच वाडी नगरपरिषदेतूनही फायर टेंडर घटनास्थळी रवाना करण्यात आले. पहाटे ३.४५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन पथकाला यश आले. या आगीत अंदाजे ५ हेक्टरवरील जंगलातील गवत जळाल्याचा अंदाज आहे. आगीचे कारण अज्ञात आहे. घटनास्थळी वनपरीक्षक क्षेत्र अधिकारी रीना राठोड उपस्थित होत्या.