जुना कामठी रोडवर फर्निचरच्या कारखाण्याला आग
By मंगेश व्यवहारे | Updated: June 26, 2024 15:46 IST2024-06-26T15:42:38+5:302024-06-26T15:46:07+5:30
Nagpur : शॉट सर्किटमुळे आग लागल्याची नोंद

Fire at a furniture factory on Juna Kamthi Road
नागपूर : जुना कामठी रोडवर असलेल्या फर्निचरच्या कारखान्याला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच कळमना अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले.
या कारखान्यात लाकडी सोफा बनत असल्याने त्यासाठी आवश्यक असलेले साहित्य मोठ्या प्रमाणात होते. आगीमध्ये हे सर्व साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन पथकाने दुपारी २ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले होते. पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार आग शॉट सर्किटमुळे लागल्याची नोंद केली आहे. आग विझविण्यासाठी लकडगंज, सुगतनगर केंद्रावरून गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.