शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

जैन कलार समाज ट्रस्ट घोटाळ्यात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवा :  हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:42 PM

जैन कलार समाज ट्रस्टमधील आर्थिक घोटाळा प्रकरणात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आर्थिक गुन्हे विभाग व सक्करदरा पोलिसांना दिला.

ठळक मुद्देविशेष लेखा परीक्षणही करण्यास सांगितले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जैन कलार समाज ट्रस्टमधील आर्थिक घोटाळा प्रकरणात २२ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आर्थिक गुन्हे विभाग व सक्करदरा पोलिसांना दिला. तसेच, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे सहा महिन्यात विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे व ट्रस्टवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देशही दिले.संबंधित २२ जणांमध्ये तत्कालीन अध्यक्ष रवींद्र देवीदास दुरुगकर, उपाध्यक्ष भूषण शंकर दडवे, कोषाध्यक्ष विलास महादेव हरडे, सचिव आनंद नारायण ठवरे, वासुदेव यशवंत गोसेवाडे, राजू श्रीराम ठवरे, शैलेंद्र भास्कर दहीकर, किशोर यादव सिरपूरकर, रमेश मोतीराम कोलते, सुरेश हरिश्चंद्र भांडारकर, राजेश सुरेश डोरलीकर, विजय मनोहर दहीकर, भाऊराव शंकर फरांडे, सुधीर अण्णासाहेब दुरुगकर, प्रभाकर बळीराम तिडके, डॉ. पुष्पा चक्रधारी दुरुगकर, विक्रांत प्रभाकर पलांदूरकर, सुधाकर देवराव खानोरकर, नरेंद्र बबन पलांदूरकर, सुधीर मुकुंद रणदिवे, दिलीप श्याम रहाटे व सिद्धेश्वर गोविंद वारजूरकर यांचा समावेश आहे. यासंदर्भात ट्रस्टचे आजीवन सदस्य अनिल शंकर तिडके यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. अंतिम सुनावणीनंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हे आदेश देऊन याचिका निकाली काढली.याचिकाकर्त्याच्या तक्रारीनंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षकांनी ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करून २१ एप्रिल २०१८ रोजी अहवाल सादर केला होता. त्यावरून ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. परिणामी, संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला जाणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या निर्णयात नोंदवले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.असे होते याचिकाकर्त्याचे म्हणणेसंबंधित २२ व्यक्तींनी ट्रस्ट व ट्रस्टच्या निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग केला. त्यांनी ट्रस्टचे कामकाज पाहताना कायदेशीर तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. ट्रस्टच्या निधीतून ब्रह्मपुरी येथे तब्बल ७२ लाख रुपयात केवळ एक एकर जमीन खरेदी करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यातच समान खसऱ्यातील उर्वरित जमीन केवळ ८० हजार रुपयात विकल्या गेली. समाजाचे सभागृह व लॉन भाड्याने देताना पावत्या दिल्या जात नव्हत्या. त्यातून कोट्यवधी रुपये हडपण्यात आले असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने त्यांच्या विनंतीनुसार हे आदेश जारी केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार