शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

नागपुरात मेट्रो स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 9:08 PM

नागपूरकर मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) नागपुरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहे. एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी मुंजे चौकातील इंटरचेंज स्टेशनपर्यंत मेट्रो पुलाचे (व्हाया डक्ट) काम पूर्ण झाले आहे. यावरून चीन येथून खरेदी केलेल्या रेल्वेचे आरडीएसओतर्फे ऑसिलेशन ट्रायल रन घेण्यात आली. शिवाय मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देप्रारंभी एअरपोर्ट, जयप्रकाशनगर, सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर थांबणार मेट्रो रेल्वे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकर मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) नागपुरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहे. एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी मुंजे चौकातील इंटरचेंज स्टेशनपर्यंत मेट्रो पुलाचे (व्हाया डक्ट) काम पूर्ण झाले आहे. यावरून चीन येथून खरेदी केलेल्या रेल्वेचे आरडीएसओतर्फे ऑसिलेशन ट्रायल रन घेण्यात आली. शिवाय मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.व्यावसायिक रन सुरू झाल्यानंतर मेट्रो रेल्वे प्रारंभी खापरी, न्यू एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट (अ‍ॅटग्रेड सेक्शन), एअरपोर्ट मेट्रो स्टेशन, जयप्रकाशनगर आणि सीताबर्डी मुंजे चौकातील इंटरचेंज मेट्रो स्टेशनपर्यंत धावणार आहे. या स्टेशनपैकी खापरी, न्यू एअरपोर्ट आणि साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या स्टेशनवर एक वर्षापासून नागपूरकरांसाठी मेट्रोच्या जॉय राईडचे आयोजन करण्यात आले.वर्धा रोडवर प्राईड हॉटेलसमोर एअरपोर्ट मेट्रो स्टेशन, रॅडिसन ब्ल्यू हॉटेल चौकातील जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन आणि मुंजे चौक, सीताबर्डी येथील स्टेशनचे काम वेगात सुरू आहे. यापैकी एअरपोर्ट आणि सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. या तिन्ही स्टेशनचे बांधकाम २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. या स्टेशनचे बांधकाम ऑक्टोबर २०२६ मध्ये सुरू झाले. आयएल अ‍ॅण्ड एफएस कंपनी बंद झाल्यानंतर काम काही दिवस थांबले होते. पण महामेट्रो अन्य कंत्राटदार कंपन्यांच्या माध्यमातून काम वेगात करीत आहे.मेट्रो स्टेशनवर असणार आधुनिक सुविधाव्यावसायिक रन सुरू होणाऱ्या एअरपोर्ट, जयप्रकाशनगर आणि इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारे एस्केलेटर, लिफ्ट, कॉनकोर्स एरिया, शॉप, नेत्रहीन व दिव्यांगांना विशेष सुविधा, रॅम्प, महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, वाहनांसाठी पार्किंग सुविधा राहणार आहे. या सुविधेसाठी आवश्यक बांधकाम सुरू आहे.ऑरेंज, फॉरेस्ट आणि मॉडर्न थीमएअरपोर्ट स्टेशनला ऑरेंज थीमवर साकार करण्यात येत आहे. स्टेशनच्या दोन्ही बाजूची भिंत (पॅनल) ऑरेंज रंगाची आहे. जयप्रकाशनगर स्टेशनसाठी फॉरेस्ट थीम आणि इंटरचेंज स्टेशन मॉडर्न थीमवर साकार करण्यात येत आहे.स्टेशनचे बांधकाम आव्हानात्मकमहामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेट्रो पुलावर (वायाडक्ट) मेट्रो स्टेशनचे बांधकाम हे आव्हानात्मक कार्य आहे. वर्धा रोडवरील मेट्रो पुलावर डबलडेकर पूल असल्यामुळे स्टेशनची उंची अन्य मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या तुलनेत जास्त आहे. ही उंची २४ मीटरपर्यंत तर अन्य स्टेशनची उंची ९ ते १० मीटर आहे. त्यामुळे डबलडेकर पूल असलेल्या मेट्रो पुलावर स्टेशनचे बांधकाम करणे अत्यंत कठीण आहे.स्टेशनवर डिस्प्ले बोर्डप्रवाशांना रेल्वेच्या फेऱ्यांची माहिती देण्यासाठी स्टेशनवर उद्घोषणा प्रणालीसह अत्याधुनिक उपकरणे लावण्यात आली असून प्रात्यक्षिक झाले आहे. डिस्प्ले बोर्डवर झळकणारी माहिती ३५ मीटर अंतरावर स्पष्ट दिसणार आहे. प्रत्येक प्लॉटफॉर्मवर ५२ इंच आकाराचे डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहेत. स्टेशनचे प्रवेशद्वार आणि परिसरात बोर्ड लावण्यात येत आहेत. प्रत्येक स्टेशनवर ८ ते १० बोर्ड राहतील. रेल्वे किती वाजता कोणत्या प्लॉटफॉर्मवर पोहोचेल, शिवाय अन्य रेल्वे त्याच मार्गावर किती वाजता येईल, याची माहिती देण्यात येणार आहे. एका बोर्डवर तीन ते चार रेल्वेचे वेळापत्रक राहील. या बोर्डाची जबाबदारी कंट्रोलरकडे देण्यात येईल. डिस्प्ले बोर्डवर मराठी, हिंदी अणि इंग्रजी भाषेत माहिती देण्यात येणार आहे. उद्घोषणा प्रणालीचे आतापर्यंत ४०० ट्रायल झाले आहेत.पंतप्रधानांच्या हस्ते ३ मार्चला उद्घाटन?नागपूर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन सुरू करण्यासाठी महामेट्रो फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि व्यावसायिक रनचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते व्हावे, अशी महामेट्रोची इच्छा आहे. या संदर्भात एक महिन्यापूर्वीच पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कार्यालयाने ३ मार्चवर शिक्कामोर्तब केले असून दोन दिवसात विस्तृत माहिती महामेट्रो कार्यालयाकडे येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

टॅग्स :Metroमेट्रोAirportविमानतळ