चित्रपट दिग्दर्शक राजदत्त नागपुरातील रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 10:22 AM2019-02-06T10:22:30+5:302019-02-06T10:23:36+5:30

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना नागपूरच्या अवंती इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कामानिमित्त काल ते नागपुरात आले होते.

Film director Rajdutt admitted to a hospital in Nagpur | चित्रपट दिग्दर्शक राजदत्त नागपुरातील रुग्णालयात दाखल

चित्रपट दिग्दर्शक राजदत्त नागपुरातील रुग्णालयात दाखल

Next
ठळक मुद्देप्रकृती स्थिर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना नागपूरच्या अवंती इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कामानिमित्त काल ते नागपुरात आले होते. रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना धंतोलीतील डॉक्टर माहुरकर यांच्या अवंती इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नागपुरात येत्या ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान होऊ घातलेल्या तिसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने देण्यात येणारा ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. यानिमित्ताने त्यांचे नागपुरात आगमन झाले होते. या कार्यक्रमात त्यांची मुलाखतही घेण्यात आली होती.

Web Title: Film director Rajdutt admitted to a hospital in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.