अल्पवयीन मजुराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:17 IST2020-10-31T00:15:54+5:302020-10-31T00:17:13+5:30
minor laborer death case, crime news अल्पवयीन मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने हिंगणा पोलिसांनी ठेकेदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मजुराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने हिंगणा पोलिसांनी ठेकेदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हिंगणा येथील कवडस केसीसी क्रशर प्लांट आहे. येथे मध्य प्रदेशातील कन्नोज येथील १७ वर्षीय लोकेश शोभाराम काकिडया हा अन्य मजुरांसोबत काम करीत होता. १२ ऑक्टोबरच्या रात्री तारेवर कापड वाळविण्यास टाकत असताना त्याला विजेचा धक्का लागला व त्याचा मृत्यू झाला. हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला. तपासात ठेकेदार अभिषेक शर्मा याने मजुरांच्या निवासाची व्यवस्था योग्य केली नसल्याचे निदर्शनास आले. या आधारावर शर्माविरुद्ध निष्काळजीपणा बाळगल्याच्या कारणाने गुन्हा दाखल करण्यात आला.