शुल्लक कारणावरून प्रेयसीला बेदम मारहाण, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 14:11 IST2021-09-21T14:05:47+5:302021-09-21T14:11:28+5:30
प्रेयसीची आई घरी आली म्हणून संतप्त झालेल्या प्रियकराने तिला बेदम मारहाण केली. याप्रकरणी प्रेयसीने प्रियकराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शुल्लक कारणावरून प्रेयसीला बेदम मारहाण, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : मैत्रिणीची आई घरी आली म्हणून संतप्त झालेल्या आरोपीने मैत्रिणीला बेदम मारहाण केली. प्रिया मस्के (वय ३६) असे जखमी महिलेचे नाव आहे. तर, आरोपीचे नाव प्रणय गजभिये (वय ३२, रा. एनआयटी गार्डनजवळ) असून, तो महापालिकेत कर्मचारी आहे.
प्रिया मस्के ही कामगारनगरात राहत असून तिची आरोपी प्रणयबरोबर सात वर्षांपासून मैत्री आहे. या मैत्रीला पुढे नेत त्या दोघांनीही एकत्र राहायचे ठरवले. सुरुवातीला सगळं नीट सुरू होतं. मात्र, हळू हळू प्रणय दारू प्यायला लागला. दारू पिऊन तो प्रियाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला, त्यातून दोघांची भांडणं व्हायला लागली.
एके दिवशी प्रियाची आई ‘महत्त्वाची बोलणी करण्यासाठी’ काही दिवसापूर्वी प्रणयाच्या घरी गेली होती. मात्र, ते प्राणायला पटले नाही आणि तो संतप्त झाला. त्याने शनिवारी सायंकाळी प्रियाचे घर गाठले. तुझी आई माझ्या घरी आलीच कशी, असा प्रश्न करून त्याने प्रियाशी वाद घातला आणि तिला बेदम मारहाण केली. आजूबाजूच्यांनी धाव घेऊन आरोपीला आवरले, नंतर प्रियाने कपिलनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. उपनिरीक्षक आर. वाय. श्रीखंडे यांनी आरोपी प्रणय गजभियेविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.