शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:10 IST

Nagpur : आयुष्याच्या सर्वात कठीण क्षणीही हार न मानणाऱ्या प्रगती जगतापने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत इतिहास रचला आहे.

नागपूर : आयुष्याच्या सर्वात कठीण क्षणीही हार न मानणाऱ्या प्रगती जगतापने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत इतिहास रचला आहे. राज्यसेवेची पूर्व परीक्षा असतानाच वडिलांचे अचानक निधन झाले. या धक्क्याने त्या नैराश्यात गेल्या होत्या, त्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने त्रास वाढला होता. पण स्वतःला सावरत, पुन्हा नव्या जोमाने अभ्यास सुरू करून त्यांनी हे यश संपादन केले आहे. 

कठीण काळात परीक्षा कालावधी

प्रगतीच्या वडिलांचे नाव सुनील जगताप, परीक्षेच्या तोंडावरच ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. ते अकोला महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण त्यांच्या अकाली निधनाने प्रगतीला मोठा आघात सहन करावा लागला. त्या काळात ती मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. 

कारकीर्द व तयारीचा प्रवास

प्रगतीने २०१८ ते २०२२ दरम्यान कृषीसेवक म्हणून काम केले होते. नंतर त्यांनी राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. २०२३ मध्ये त्यांची उपविभागीय आयुक्त म्हणून निवड झाली होती. कळमेश्वर येथे सहायक गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाल्या. राज्यसेवेचा अभ्यास चालू ठेवला. यावर्षी मुख्य परीक्षा २७ ते २९ मे यादरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर वैयक्तिक मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत झाल्या आणि निकाल रात्री जाहीर झाला. 

यशाचे महत्त्व

प्रगतीने सामाजिकदृष्ट्या मागासवर्गातील (SC) गटातून येऊन उच्च स्थान मिळविले आहे. हे यश अनेक बाबींमध्ये महत्त्वाचे ठरते.  हे तिच्या कठीण परिश्रमांचा प्रतिफळ आहे. प्रगतीला मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा महापालिकेत सहाय्यक आयुक्त पद मिळू शकते. पुढे तिला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण व्हायचे आहेत आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू राहतील. 

तिच्या या यशाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. प्रगतीचे हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेषतः सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय समाजघटकातील विद्यार्थ्यांसाठी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy to Triumph: Nagpur Woman Tops State Exam After Loss

Web Summary : Despite her father's death and her own illness, Pragati Jagtap of Nagpur secured first rank in the state civil service exam from the scheduled caste category. Overcoming immense personal challenges, she achieved her dream, inspiring many.
टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रnagpurनागपूरVidarbhaविदर्भVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी