शिक्षण घोटाळ्यातील अपात्र मुख्याध्यापक पुडकेच्या वडिलांना अटक, जामिनावर लगेच सुटका

By योगेश पांडे | Updated: June 10, 2025 23:36 IST2025-06-10T23:35:03+5:302025-06-10T23:36:08+5:30

राजश्री शिक्षण संस्थेचा संस्थाचालक चरण चेटुलेला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तीन दिवसांनी नानाजी पुडकेला अटक केली.

Father of disqualified principal Pudke arrested in education scam, released on bail immediately | शिक्षण घोटाळ्यातील अपात्र मुख्याध्यापक पुडकेच्या वडिलांना अटक, जामिनावर लगेच सुटका

शिक्षण घोटाळ्यातील अपात्र मुख्याध्यापक पुडकेच्या वडिलांना अटक, जामिनावर लगेच सुटका

- योगेश पांडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस दस्तावेजांच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांनी अपात्र मुख्याध्यापक पराग पुडकेचे वडील नानाजी पुडकेला अटक केली. मात्र तांत्रिक कारणांमुळे लगेच जामिनावर सुटकादेखील करण्यात आली. पुडके संबंधित शिक्षणसंस्थेत सचिव असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी एप्रिल महिन्यात या प्रकरणात राजू केवलराम मेश्राम (५९, अर्जुनी मोरगाव, भंडारा) याला अटक केली होती. तो अर्जुनी मोरगाव येथील पिंपळगावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत सचिव होता. राजू मेश्रामची ‘लिंक’ बोगस दस्तावेज बनविणारा शिक्षक महेंद्र म्हैसकर याच्यासोबत होती. अटक करण्यात आलेला मुख्याध्यापक पराग पुडके याचे वडील नानाजीसोबत राजू मेश्रामची ओळखी होती. आपल्या मुलाचा कुठेतरी जुगाड करायचा आहे असे पुडकेने मेश्रामला सांगितले. तेव्हा मेश्रामने पुडकेची ओळखी महेंद्र म्हैसकरसोबत करवून दिली. त्यानंतर म्हैसकरने पराग पुडकेचे बोगस दस्तावेज तयार केले होते.

या प्रकरणात राजश्री शिक्षण संस्थेचा संस्थाचालक चरण चेटुलेला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तीन दिवसांनी नानाजी पुडकेला अटक केली. मात्र तांत्रिक कारणामुळे न्यायालयाने पुडकेची सुटका केली. याविरोधात पोलिसांकडून न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Father of disqualified principal Pudke arrested in education scam, released on bail immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.