शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बाप आणि आजोबाच निघाले हैवान ! १२ वर्षीय चिमुरडीसोबत भयावह घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:00 IST

खात येथील प्रकार : पीडिता ही गतिमंद, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कखात : उन्हाळ्याच्या सुटीत व त्यानंतर शाळेला सुटी असल्यावर घरी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीवर तिच्या बापासह आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याचा केल्याचा प्रकार अरोली (ता. मौदा) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खात येथे घडला असून, मानकापूर (नागपूर) पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, ती १२ वर्षीय पीडिता नागपुरातील निवासी शाळेत शिकत असल्याने तिच्या मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला.

रमेश धनराज खोडके (३९) व धनराज कवडू खोडके (७५) दोघेही रा. खात, ता. मौदा अशी आरोपींची नावे आहेत. पीडिता ही तिच्या आईऐवजी वडिलांकडे राहात असून, ती गतिमंद असल्याने नागपुरातील गतिमंदांच्या निवासी शाळेत शिक्षण घेते. रमेशला दारूचे व्यसन असून, त्याने तीन लग्न केले. मात्र, एकही पत्नी त्याच्याजवळ राहात नसल्याने तो व त्याचे वडील दोघेच राहतात.

ती उन्हाळ्याच्या सुटीत एप्रिल २०२५ मध्ये नागपूरहून खात येथे आली होती. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या काळात वडील, आजोबा या दोघांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ती शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापिकेला संशय आला आणि त्यांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली. त्यामुळे प्रकरण उघड झाले. मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४ (२) (क) (म), ६५ (२), ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे सहकलम ४, ६ अन्वये गुन्हा नोंदविला. मानकापूर पोलिसांच्या सूचनेवरून अरोली (ता. मौदा) पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध याच कलमान्वये गुन्हा नोंदवून दोघांना ताब्यात घेतले आहे.

प्रश्नोत्तरी बयाण

ती शिक्षण घेत असलेली शाळा मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. मुख्याध्यापिकेकडून तक्रार अर्ज प्राप्त होताच मानकापूर पोलिसांसमोर पीडितेचे बयाण नोंदविण्याची समस्या निर्माण झाली होती. मुख्याध्यापिकेने तिला विश्वासात घेऊन काही प्रश्न विचारले. तिनेही त्या प्रश्नांची उत्तरे देत घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. त्यामुळे पोलिसांनी तिचे बयाण प्रश्नोत्तरी स्वरूपात नोंदवून घेतले आणि अरोली पोलिसांना कळविले. अरोली पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला पाठविले. दोघांचेही वैद्यकीय तपासणी अहवाल व आवश्यक पुरावे सीलबंद मागविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक एस. एस. सोनवाने यांनी दिली.

भेटणे व बोलण्यास मज्जाव

आरोपी धनराज खोडके याचे खात येथे घराला लागूनच छोटे दुकान आहे. त्या दोघांनी दुकानातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने बयाणात सांगितले. ती गावाला घरी आल्यानंतर वडील व आजोबा तिला कुणाशी बोलू देत नव्हते व कुणाला भेटूदेखील देत नव्हते. दोघेही तिच्यावर सतत नजर ठेवून असायचे. तिला एकटे कुठेही जाऊ देत नव्हते, अशी माहिती तिच्या खात येथील घराशेजारी राहणाऱ्या अनेकांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरSexual abuseलैंगिक शोषणPOCSO Actपॉक्सो कायदा