संवैधानिक आरक्षणासाठी ओबीसींचे साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:14 IST2019-08-27T22:13:16+5:302019-08-27T22:14:07+5:30
संवैधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे मंगळवारपासून संविधान चौकात तीन दिवसीय साखळी उपोषण आयोजित केले आहे.

संवैधानिक आरक्षणासाठी ओबीसींचे साखळी उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संवैधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघातर्फे मंगळवारपासून संविधान चौकात तीन दिवसीय साखळी उपोषण आयोजित केले आहे.‘सेव्ह रिझर्व्हेशन, सेव्ह कॉन्स्टिट्युशन, सेव्ह इंडिया’ या बॅनरअंतर्गत करण्यात येत असलेल्या या आंदोलनात अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने आरोप केला की, सेव्ह मेरिट सेव्ह नेशनतर्फे आरक्षणाला बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता संविधानात आरक्षणाची संधी म्हणून तरतूद असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. महासंघाची मागणी आहे की, संपूर्ण देशातील जातींची जनगणना करून लोकसंख्येनुसार सर्व प्रवर्गांना आरक्षण देण्यात यावे. ओबीसींची जनगणना करण्यात यावी. शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करून ‘वन नेशन वन एज्युकेशन’ धोरण राबविण्यात यावे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर मुलामुलींची स्वतंत्र वसतिगृहे सुरू करावीत. विद्यार्थ्यांसाठी स्वाधान योजना सुरू करावी, खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे. आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष नीलेश कोढे, रोशन कुंभलकर, विनोद हजारे, मयूर वाघ, प्रणव धोटे, चेतन काळे, अक्षय वानखेडे, सौरभ पोटफोडे, पलाश मयोर, उज्ज्वला महल्ले, सोनिया वैद्य, रेणुका धुळस, ऐश्वर्या खोब्रागडे, श्रुती माथुरकर, मनीषा गोटे, पूजा निनावे, अॅड. रेखा बाराहाते, कल्पना मानकर, नंदा देशमुख, रेखा वहाड, लक्ष्मी सावरकर, शरद वानखेडे, संजय पन्नासे, शकील पटेल, पंकज पांडे, विनोद उलीपवार, पांडुरंग काकडे, गुणेश्वर आरीकर, दिवाकर वर्षे, प्रमोद मून, विकास गौर, रमेश पिसे, निकेश पिने, निकेश ढोके, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धांत पाटील, हरिकिशन हटवार, नरेश वाहणे, मिलिंद फुलझेले आदी सहभागी झाले होते.