नियमबाह्य खाेदकाम विराेधात शेतकऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:55+5:302020-12-30T04:11:55+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : समृद्धी मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतातील पिकांचे माेठे नुकसान झाले ...

Farmers protest against illegal mining | नियमबाह्य खाेदकाम विराेधात शेतकऱ्यांची निदर्शने

नियमबाह्य खाेदकाम विराेधात शेतकऱ्यांची निदर्शने

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा : समृद्धी मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतातील पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. यात पाेचमार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गासाठी नियमबाह्य खाेदकाम करण्यात आले असून, त्याला शेतकऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंडाची रक्कम माेठी असून, ती भरण्याचे आदेशही शेतकऱ्यांना देण्यात आले. या प्रकाराच्या विराेधात शेतकऱ्यांनी साेमवारी (दि. २८) कान्हाेलीबारा (ता. हिंगणा) येथे निदर्शने केली.

राज्यातील इतर भागाच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात समृद्धी मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. या कामासाठी लागणाऱ्या मुरुम, माती व दगडासाठी कंत्राटदाराने शेतकऱ्यांकडून जमिनी लीजवर घेतल्या हाेत्या. त्या जागेवर खाेदकाम करण्याची तहसील कार्यालयाकडून परवानगी घेतली हाेती. कंत्राटदाराने तिथे परवानगीपेक्षा अधिक खाेदकाम केले. हा प्रकार लक्षात येताच प्रशासनाने शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली. दंडाची रक्कम भरणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

ओव्हरलाेड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास हाेत आहे. वाहनांमुळे उडणारी धूळ माेठ्या प्रमाणात पिकांवर बसत असल्यने पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने काेणतीही कारवाई केली नाही. दंडात्मक कारवाई ही कंत्राटदारावर करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी समृद्धी मार्ग कॅम्प, कान्हाेलीबारा येथे निदर्शने केली. आ. समीर मेघे यांनी प्रकल्प व्यवस्थापक बिजलीकुमार यांच्याशी चर्चा केली.

आंदाेलनात जिल्हा परिषद सदस्य आतिश उमरे, अर्चना गिरी, पंचायत समिती सदस्य संजय ढोढरे, अंबादास उके, धनराज आष्टनकर, हरिशचंद्र अवचट, जितू बोटरे, शुभम उडाण, दिगांबर धामणे, अरुण कोहळे, विशाल भोसले, विकास दाभेकर, सतीश शहाकार, आबा काळे, सुरेश काळबांडे, अक्षय लोडे, आदर्श पटले, नाना हुसकुले, किशोर गंधारे, देवराव आदमने, मनोहर कावळे, गुणवंत वाटकर, सुनील गावंडे, उमेश फुलकर, वसंता बोंडे, विजय दुधबडे, तुषार लोखंडे, अरविंद कन्नाके, नागाेराव गव्हाळे, भीमा गोहाणे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले हाेते.

Web Title: Farmers protest against illegal mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.