शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

नागपूर जिल्ह्यातील बडेगावनजीक अवैध रेती वाहतुकीने घेतला शेतकऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 20:59 IST

अवैध रेतीवाहतूक करणाऱ्या  भरधाव ट्रकने सायकलस्वार शेतकऱ्यास जोरदार धडक दिली. त्यात ‘त्या’ शेतकऱ्या चा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले होते.

ठळक मुद्देसंतप्त नागरिकांचा रस्तारोको, ट्रक जाळण्याचा प्रयत्नट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले

आॅनलाईन लोकमत

नागपूर : अवैध रेतीवाहतूक करणाऱ्या  भरधाव ट्रकने सायकलस्वार शेतकऱ्यास जोरदार धडक दिली. त्यात ‘त्या’ शेतकऱ्या चा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले होते. मात्र, पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.दामोदर साधू बेंदरे (५५, रा. बडेगाव, ता. सावनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दामोदर बेंदरे हे सायकलने शेतातून घरी परत येत होते. दरम्यान, गावाजवळ रेती घेऊन जात असलेल्या एमएच-४०/वाय-३९०० क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या सायकलला मागून धडक दिली. ट्रकचे समोरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले तर सायकल काही दूरवर फरफटत गेली. अपघाताच्या आवाजाचे गावातील चौकात बसलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत ट्रकचालकाने ट्रक सोडून पळ काढला. नागरिकांनी बेंदरे यांनी लगेच नजीकच्या रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.रेतीवाहतुकीला आधीच विरोध असल्यामुळे या अपघाताने नागरिक संतप्त झाले. काहींनी ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला तर काहींनी ट्रकच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. त्यातच काहींनी रोडवर टायर पेटविले होते. या प्रकारामुळे बडेगाव येथे तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. या अपघातामुळे बडेगाव - टेंभूरडोह मार्ग दुपारी ३ वाजेपर्यंत बंद होता. या प्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून ट्रकचालक सावन राजू वासनिक (२८, रा. कोराडी, ता. कामठी) यास नंतर अटक केली.रेतीवाहतूक बंद करण्याची मागणीघटनेची माहिती मिळताच खाप्याच्या ठाणेदार अनामिका मिर्झापुरे, तहसीलदार राजू रणवीर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर यांनी घटनास्थळ गाठले. शिवाय, दंगा नियंत्रण पथकालाही बोलावण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी तहसीलदार रणवीर यांच्याकडे बडेगाव मार्गे होणारी रेतीची संपूर्ण वाहतूक कायमची बंद करा, अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रकचालक व मालकाविरुद्ध कठोर कारवाई करा तसेच या भागात चौकी सुरू करण्याची मागणी रेटून धरली होती. तहसीलदारांनी तिन्ही मागण्या मान्य करीत मृताच्या कुटुंबीयांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले.रेती वाहतुकीचा मार्ग बदलविलाटेंभूरडोह शिवारातील कालव्याच्या पुलावरून रेतीची ओव्हरलोड वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. तरीही हा ट्रक रेती घेऊन खेकरानाला पुलावरून बडेगाव मार्गे जात होता. विशेष म्हणजे, या मार्गे सतत रेतीची वाहतूक केली जाते. बडेगाव येथे अपघातामुळे तणाव असल्याची माहिती मिळताच चालकांनी रेतीच्या सर्व ट्रकचा मार्ग ऐनवेळी बदलला. बडेगाव मार्गे येणारे सर्व ट्रक परत मालेगाव (ता. सौंसर, जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश) रेतीघाटात गेले आणि तिथून सावनेर मार्गे नियोजित ठिकाणी गेले.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघनटेंभूरडोह शिवारातील खेकरानाला प्रकल्पाच्या कालव्यावरील पुलावरून रेतीची वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले होते. या मार्गाने मध्य प्रदेशातील रेती सावनेर तालुक्यात आणली जाते. ओव्हरलोड रेतीवाहतुकीमुळे कालव्यावरील पूल कोसळण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, महसूल व पाटबंधारे विभागाचे ही वाहतूक बंद करण्यासाठी फलक लावण्याशिवाय काहीही केले नाही. वाहतूक रोखण्यासाठी पुलावर सिमेंट खांब रोवले होते. मात्र, रेतीमाफियांनी तेही काही तासांतच पाडले. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर