शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घराबाहेर पडताय... खबरदारी घ्या! वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 19:22 IST

गेल्या अडीच महिन्यापासून असलेला लॉकडाऊन आता अनलॉक झाला आहे. राज्य शासनाने दिलेल्या सवलतीनंतर शहरात वर्दळ सुरू झाली आहे. मात्र नागपुरात कोरोना संपलेला नाही. यामुळे यापुढे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या अडीच महिन्यापासून असलेला लॉकडाऊन आता अनलॉक झाला आहे. राज्य शासनाने दिलेल्या सवलतीनंतर शहरात वर्दळ सुरू झाली आहे. मात्र नागपुरात कोरोना संपलेला नाही. यामुळे यापुढे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना आजाराची साखळी तोडण्यासाठी मुख्यत्वे मास्क, सॅनिटायझर, रुमाल सोबतच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे राहणार आहे. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले की, बाधित व्यक्तीच्या शिंकण्यातून आणि खोकण्यातून जे तोंडावाटे थेंब बाहेर पडतात, त्यातून हा आजार पसरतो. हे उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात. त्याला स्पर्श झाला तर हाताला चिकटतात. ते हात जर वारंवार चेहरा, डोळे, नाक याला लावले गेले तर आजार पसरतो. सध्या कोरोनाच्या आजारावर औषध किंवा लस उपलब्ध नाही. लक्षणांवरून उपचार केले जातात. यामुळे ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडाची चव जाणे, अशक्तपणा अशी लक्षणे आढळून येतात. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी वारंवार हात साबण अथवा सॅनिटायझरने धुतले पाहिले. शिंकताना किंवा खोकताना नाक, तोंडावर रुमाल किंवा टिश्यूपेपर धरावा. याखेरीज, कोरोनाप्रमाणे अन्य पावसातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार, उघड्यावरील पदार्थ न खाणे, दूषित पाणी-बर्फाचे सेवन टाळणे यावर भर दिला पाहिजे. जेणेकरून आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.हे लक्षात ठेवासार्वजनिक ठिकाणी कमीत कमी १ मीटर/ तीन फूट अंतर ठेवाशांतता राखा, प्रवास करताना संयम राखा, गर्दी करू नकादैनंदिन जीवनात वा शुभेच्छा देण्यासाठी हस्तांदोलन, गळाभेट टाळाएकमेकांमध्ये नेहमी योग्य अंतर ठेवाघरी पाहुणचार टाळा, इतरांच्या घरी जाणे टाळाप्रवास करताना, घरी वा कार्यालयात वावरताना अनावश्यक गर्दी होऊ देऊ नकाआरोग्याची कुठलीही तक्रार भासल्यास आरोग्य केंद्रास किंवा महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा.मास्क वापरताना अशी घ्या काळजीमास्कचे प्लिट खालील बाजूस उघडा व नाक, तोंड आणि हनुवटी झाकून जाईल अशा पद्धतीने लावावा. आपला चेहरा व मास्क यामध्ये अंतर असू नये, याची खात्री करा. मास्क खाली खेचू नका किंवा मानेला लटकत ठेवू नका, मास्कला सतत स्पर्श करू नका.  मास्क काढण्यासाठी प्रथम दोरीचा खालचा भाग व त्यानंतर वरचा भाग काढा. दोरीच्या वरच्या बाजूचा वापर करून मास्क हाताळा. मास्क काढताना इतर पृष्ठभागाला स्पर्श करू नका.मास्कला आपण अनवधनाने स्पर्श करतो. यामुळे हात वरचेवर स्वच्छ धुवा. एकदा वापरण्यायोग्य मास्क पुन्हा वापरू नका. काढल्यानंतर त्याची घरगुती ब्लिच सोल्युशनमध्ये भिजवून त्वरित बंद कचरापेटीत फेकून विल्हेवाट लावा.आता प्रत्येकाला कोरोना वॉरिअर्स व्हावे लागेललॉकडाऊन शिथिल झाल्याने काही ठिकाणी गर्दी होण्याची व नियम न पाळले जाण्याची भीती आहे. आपल्याला कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर प्रत्येकाला नियमांचे पालन करावे लागेल. घराबाहेर पडताना मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करावा लागेल. म्हणजेच प्रत्येकाला कोरोना वॉरिअर्स व्हावे लागेल.डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स