शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात बनावट जात वैधता प्रमाणपत्राचा भांडाफोड, नागपुरात ११ जणांवर गुन्हे दाखल

By मंगेश व्यवहारे | Updated: March 31, 2026 14:56 IST

Nagpur : अनुसूचित जमातीच्या बनावट जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसूचित जमातीच्या बनावट जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पितळ उघडे पडले आहे. राज्याच्या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) ने अशा विद्यार्थ्यांची यादी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे (टीआरटीआय) कडे पाठविली असून, यांच्या वैधता तपासून अहवाल मागितला आहे. 'टीआरटीआय'ने यासंदर्भात राज्यातील १५ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे त्या याद्या पाठविल्या असून, नागपूर समितीने पाचगाव पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध तक्रार केली आहे. या प्रकरणी राज्यात पहिला गुन्हा नागपुरात दाखल झाला आहे.

'टीआरटीआय'ने नागपूर समितीकडे ४० विद्यार्थ्यांचे पडताळणी प्रमाणपत्रांचे अहवाल मागितले होते. हे विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीएसारख्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित असून, अनुसूचित जमातीचा लाभ घेत आहेत. या ४० पैकी ३ विद्यार्थ्यांनी समितीकडे वैधतेसाठी अर्ज केले होते. त्या ३ विद्यार्थ्यांची समितीने सुनावणी घेतली. या विद्यार्थ्यांना समितीने अजूनही प्रमाणपत्र दिले नसताना त्यांनी सीईटी सेलकडे पडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते.

समितीच्या तपासात यात ११ जण दोषी आढळले. यात एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचाही समावेश आहे. हे महाविद्यालय पाचगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने समितीच्या दक्षता पथकाने पाचगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली. तर उरलेल्या ३७ विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वैधतेसंदर्भात नागपूर समितीकडे कुठलेही अर्ज आलेले नाही. त्यामुळे नागपूर समितीने ३७ विद्यार्थ्यांच्या वैधता आमच्याकडून देण्यात आल्या नाहीत आणि तीन विद्यार्थ्यांच्या प्रकरणात केलेल्या कारवाईची माहिती टीआरटीआयला कळविली असल्याचे नागपूर समितीचे उपसंचालक नीरज मोरे यांनी सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील पंधराही समित्यांना 'टीआरटीआय'ने विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यास सांगितले आहे. यात बनावट वैधता प्रमाणपत्राचा मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यता आहे.

आरोपीत प्राध्यापक, दलालांचा समावेश

पोलिस स्टेशन पाचगाव येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अभियांत्रिकी कॉलेजचा प्राध्यापक, दोन सहायक प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारे ३ दलाल आदींचा समावेश आहे.

आरोपींविरुद्ध दिलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४),३३८, ३३६(३), ३४० (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक वृष्टी जैन यांनी दिली.

"अनुसूचित जमाती नामसदृशाचा फायदा घेऊन बोगस प्रमाणपत्राद्वारे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी व उच्च शिक्षणात प्रवेश घेतला आहे. यामुळे खरे आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून मुकले आहेत. या बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या व्यक्ती व सेतू केंद्रावर गुन्हे दाखल करावे. एसआयटीमार्फत या प्रकरणाचा तपास करावा."- एन. झेड. कुमरे, ट्रायबल ऑफिसर फोरम

English
हिंदी सारांश
Web Title : Fake caste certificate racket busted in Maharashtra; 11 booked in Nagpur.

Web Summary : A fake caste certificate scam has been exposed in Maharashtra. Eleven individuals in Nagpur are booked for using bogus Scheduled Tribe certificates to gain admission to professional courses. Investigation is underway, revealing a network involving students, parents, professors and agents.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीGovernmentसरकार