शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कचरामुक्त शहरासाठी पुन्हा कनकवरच विश्वास

By admin | Updated: June 13, 2014 01:18 IST

कनक रिसोर्सेस कंपनीकडून खोट्या माहितीच्या आधारे जादाची रक्कम घेतल्याचा ठपका ठेवून पैसे वसुलण्याची शिफारस करण्यात आली होती. यावर आयुक्तांनी कंपनीला नोटीस बजावून कंत्राट रद्द का करण्यात येऊ नये,

मनपाची क्लीन चिट : कचरा उचलण्यासाठी महिन्याला देणार सव्वादोन कोटी
नागपूर : कनक रिसोर्सेस कंपनीकडून खोट्या माहितीच्या आधारे जादाची रक्कम घेतल्याचा ठपका ठेवून पैसे वसुलण्याची शिफारस करण्यात आली होती. यावर आयुक्तांनी कंपनीला नोटीस बजावून कंत्राट रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती. असे असतानाही कचरामुक्त शहर योजना राबविण्यासाठी पुन्हा एकदा कनक रिसोर्सेसवर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली आहे. याअंतर्गत कचरा उचलण्यासाठी महापालिका कनक रिसोर्सेसला महिन्याला सव्वादोन कोटी रुपये देणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेने एकप्रकारे कनक रिसोर्सेस कंपनीला क्लीन चिट दिली आहे.


शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट २००९ मध्ये कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आले होते. १० वर्षाचा करार असला तरी पाच वर्षांनी त्यासाठी प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी कनक रिसोर्सेस कंपनीला कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला होता. २७ कोटी याप्रमाणे पाच वर्षाकरिता १३५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान कंपनीने खोट्या माहितीच्या आधारे जादाची रक्कम घेतल्याचा खुलासा आॅडिटमध्ये झाला होता. ही रक्कम वसूल करण्याची शिफारस आॅडिटमध्ये करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त श्याम वर्धने यांनी कंपनीला नोटीस बजावली होती. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्यासमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता.


मात्र, कंपनीला कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला असल्याने या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नाही. गुरुवारी पुन्हा तोच प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आला असता स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी प्रदान करीत एकप्रकारे प्रशासनाने कनक रिसोर्सेस कंपनीला क्लीन चिट दिली आहे. (प्रतिनिधी)