शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचे मताधिक्य ‘टॉप’वर

By admin | Updated: October 20, 2014 00:40 IST

शहर व जिल्ह्यात भाजपने १२ पैकी तब्बल ११ जागा जिंकल्या. दक्षिण-पश्चिममध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक ५८ हजार ९४३ मतांनी विजयी झाले. तर ऐनवेळी काटोलमध्ये पाठविण्यात आलेले

सर्वाधिक मतांनी विजयी : मोदींच्या सभेने तारले पश्चिमनागपूर : शहर व जिल्ह्यात भाजपने १२ पैकी तब्बल ११ जागा जिंकल्या. दक्षिण-पश्चिममध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक ५८ हजार ९४३ मतांनी विजयी झाले. तर ऐनवेळी काटोलमध्ये पाठविण्यात आलेले भाजपचे आशिष देशमुख यांचे मताधिक्य सर्वात कमी राहिले. त्यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांना ५ हजार ५५७ मतांनी मात दिली. पश्चिम नागपूर मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. या सभेने ‘अ‍ॅन्टी इन्कम्बंसी’असतानाही सुधाकर देशमुख यांना तारले.फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांना एकतर्फी पराभूत केले. पहिल्या फेरीपासूनच फडणवीस आघाडीवर होते. जसजशा फेऱ्या होत गेल्या तसतशी फडणवीस यांची आघाडी वाढत गेली. काटोलमध्ये काका-पुतण्यात काट्याची टक्कर झाली. आशिष देशमुख सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. मध्ये लीड समतोल झाली होती. पण शेवटी त्यांनी बाजी मारली. येथे शिवसेना भाजपचे मतविभाजन करण्यात अपयशी ठरली. राजेंद्र हरणे यांना फक्त १३ हजार ६४९ मते मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पश्चिम नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर झाली होती. या सभेला मोठी गर्दी झाली होती. पश्चिम नागपुरात भाजपचे सुधाकर देशमुख यांच्यासमोर काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे आव्हान होते. पण मोदींची सभा झाली आणि पश्चिममध्ये भाजपची लहर चालली. या लहरीने देशमुख यांना मोठ्या विजयापर्यंत नेऊन ठेवले. (प्रतिनिधी)