शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एम्समध्ये आता लिंग बदलासारख्या सुविधाही उपलब्ध होणार

By सुमेध वाघमार | Updated: June 7, 2024 18:19 IST

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र उपचार : मध्य भारतातील पहिले शासकीय केंद्र

सुमेध वाघमारे नागपूर : तृतीयपंथीयांवरील उपचाराची सोय केवळ दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) होती. परंतु आता नागपूर ‘एम्स’मध्येही तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हे मध्य भारतातील पहिले शासकीय रुग्णालय ठरले आहे. विशेष म्हणजे, येथे लिंग बदलासारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही उपलब्ध असणार आहे.    

सध्या शासकीय रुग्णालयात तृतीयपंथीयांवर सामान्यांसोबतच उपचार होतात. परिणामी, अनेक तृतीयपंथीय रुग्ण उपचार टाळतात. कालांतराने त्यांची प्रकृती गंभीर होते. दिल्लीच्या धर्तीवर नागपूर ‘एम्स’मध्येही ‘ट्रान्सजेंडर क्लिनिक’ स्थापन करण्यासाठी मिशन विश्व ममत्व फाऊंडेशन या सामाजिक संघटनेने पाठपुरावा केला. अखेर याला यश आले. नुकतेच या उपचार केंद्राचे उद्घाटन झाले. या प्रसंगी ‘एम्स’चे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत पी. पी. जोशी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी, मिशन विश्व ममत्व फाऊंडेशनचा श्रद्धा जोशी, डॉ. बराई आदी उपस्थित होते. डॉ. जोशी म्हणाले,  या केंद्रात मानसोपचार, एंडोक्राइनोलॉजी, यूरोलॉजी, त्वचारोग, प्लास्टिक सर्जरी विभागाचे तज्ज्ञ एकत्र येऊन एकाच ठिकाणी सेवा देतील. लिंग बदलांच्या शस्त्रक्रियेसह मानसोपचार, हार्मोनल उपचार आणि कॉस्मेटिक शस्त्रक्रियांसह सर्वच उपचार उपलब्ध असतील.  दिल्ली एम्सनंतर भोपाळ आणि रायपूर एम्सलाही नुकतेच असे केंद्र सुरू झाले आहे. 

नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकीडॉ. जोशी म्हणाले, ‘एम्स’मधील हा उपक्रम सर्वसमावेशक आरोग्यसेवेसाठी महत्त्वाचा आहे. सुरुवातीला आठवड्यात एक दिवस बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत हे केंद्र सुरू राहिल. कालांतराने रुग्णांच्या प्रतिसादानुसार त्यात वाढ होणार आहे. तृतीयपंथियांचा नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी असणार असून आवश्यक सर्व उपचारांच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयnagpurनागपूरdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल