फेसबूक फ्रेण्डशिप : विवाहितेवर वेटरचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:20 IST2021-04-10T01:15:35+5:302021-04-10T01:20:44+5:30

Rape, crime news अमरावती येथील एका हॉटेलमध्ये वेटर असलेल्या नितीन श्रीधर थोरात (वय ३०, रा.यसुरणा, अचलपूर) याने एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

Facebook friendship: Waiter rapes married woman | फेसबूक फ्रेण्डशिप : विवाहितेवर वेटरचा बलात्कार

फेसबूक फ्रेण्डशिप : विवाहितेवर वेटरचा बलात्कार

ठळक मुद्देसीताबर्डीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर -अमरावती येथील एका हॉटेलमध्ये वेटर असलेल्या नितीन श्रीधर थोरात (वय ३०, रा.यसुरणा, अचलपूर) याने एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. १२ ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान घडलेल्या या बलात्कार प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नितीन आणि तक्रार करणारी महिला यांची फेसबूकवर ओळख झाली होती. ती विवाहित असून, नितीनपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. नितीन आणि तिने लग्नाचा निर्णय घेतला आणि ठिकठिकाणी जाऊन शरिरसंबंध जोडले. आरोपी नितीनने तिला नागपुरातील नवनीत लॉजमध्ये आणून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर नकळतपणे व्हिडीओ तयार केला. तो दाखवून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. दरम्यान, ३० मार्चला आरोपीने महिलेला अमरावतीला बोलवून महिंद्रा कॉलनीत एका ठिकाणी डांबून ठेवले. तेथेही त्याने तिच्यावर बलात्कार केला. तो अलिकडे तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागल्याने महिलेने गुरुवारी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Facebook friendship: Waiter rapes married woman