फेसबुकच्या मैत्रीने केला घात, लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 11:10 IST2021-09-23T11:02:54+5:302021-09-23T11:10:55+5:30

फेसबुकवर झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले, एकमेकांना लग्नाचे वचन दिले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी संबंध प्रस्तापित केले. मात्र, लग्नास नकार दिला.

facebook friend assaults a girl by false marriage proposal | फेसबुकच्या मैत्रीने केला घात, लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

फेसबुकच्या मैत्रीने केला घात, लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून फेसबुक फ्रेंडने भंडारा येथील तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीने भंडारा पोलिसात गुन्हा दाखल केला. समाधान रामचंद्र पवार (२४) रा. कामोठे नवी मुंबई असे आरोपीचे नाव आहे. 

आजकालची पिढी आणि सोशल मिडीया हे एक नवीन समीकरण बनलयं. परंतु, याचा अतिवापर हा आपल्याला धोक्यात टाकू शकतो. भंडारा येथील एका तरुणीची समाधान पवारशी फेसबुकवरून ओळख झाली. चॅटिंग सुरू झाली, हळू-हळू बोलणे वाढले. यानंतर पवारने तिला भेटण्यासाठी नागपूरला बोलावले. २३ सप्टेंबर २०२० रोजी तरुणी नागपूरला आली. 

तरुणी तीन दिवस सेंट्रल एव्हेन्यूच्या हॉटेल ओरिएंटमध्ये पवारसोबत राहिली. पवारने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर तो मुंबईला परत गेला. यानंतर तो तिच्याशी बोलण्यास टाळाटाळ करू लागला व लग्नाची गोष्ट निघताच त्याने नकार दिला. यामुळे त्रस्त तरुणीने भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. भंडारा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण गणेशपेठ पोलिसांकडे पाठविले आहे.

 

Web Title: facebook friend assaults a girl by false marriage proposal