वीज बिल भरण्यास मुदतवाढ : मार्च व एप्रिल महिन्यासाठी दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 00:28 IST2020-04-14T00:27:28+5:302020-04-14T00:28:06+5:30

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्याचे वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला तसे आदेश दिले आहेत.

Extension to pay electricity bills: Relief for the months of March and April | वीज बिल भरण्यास मुदतवाढ : मार्च व एप्रिल महिन्यासाठी दिलासा

वीज बिल भरण्यास मुदतवाढ : मार्च व एप्रिल महिन्यासाठी दिलासा

ठळक मुद्देरीडिंग नसल्यास पाठवणार सरासरी बिल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्याचे वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला तसे आदेश दिले आहेत. आता मार्च महिन्याचे वीज बिल १५ मेपर्यंत आणि एप्रिल महिन्याचे वीज बिल ३१ मेपर्यंत भरता येईल. औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज बिलातील स्थिर आकार तीन महिने रद्द करण्याच्या दुसऱ्याच दिवशी नागरिकांना हा दुसरा दिलासा देण्यात आला, हे विशेष.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले आहे; सोबतच वीज बिलाची छपाई व वितरणदेखील बंद करण्यात आले आहे. तसेच वीज बिल भरणा केंद्रदेखील बंद आहेत. त्यामुळे वीज बिल भरण्याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. परंतु महावितरणने अगोदरच हे स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत रीडिंग होत नाही, तोपर्यंत सरासरी वीज बिल पाठवले जातील. रीडिंग सुरू झाल्यावर त्याचे समायोजन करून ते बिल ग्राहकांना पाठवले जातील.
ग्राहकांनी स्वत: मीटरचे रीडिंग पाठवा
महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वत: रीडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे अपलोड करावेत, यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रीडिंगचे वीज बिल प्राप्त होईल. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावे, असा ‘एसएमएस’ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या राज्यातील २ कोटी १० लाखापेक्षा अधिक वीजग्राहकांना पाठविण्यात येत आहे. अशा नागरिकांनी अचूक वीज बिल भरावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Extension to pay electricity bills: Relief for the months of March and April