जितेंद्र ढवळे/ योगेश पांडे-नागपूर
नागपूर : काटोल तालुक्याती राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या एक्स्प्लोजिव्ह कंपनीत स्फोट झाला असून त्यात १५ कामगारांचा मृत्यू झाला. तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राऊळगावजवळील येनवरा येथे एसबीएल एनर्जीचे युनिट आहे. तेथे विविध डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सिजमिक एक्स्प्लोसिव्ह्सचे उत्पादन होते. त्यातीलच एका युनिटमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यावेळी ३० हून अधिक कर्मचारी विविध युनिटमध्ये काम करत होते. स्फोटाचे आवाज आजूबाजूच्या गावांमध्येदेखील ऐकू आले. त्यामुळे अनेक जण घराबाहेर आले. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.
यात १५ हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपुरकडे हलविण्यात आले आहे. काही कामगार मलब्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. यात नेमकी किती प्राणहानी झाली याचा आकडा समोर आलेला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाचहून अधिक कामगार मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे.
Web Summary : A blast occurred at SBL Explosives near Nagpur, injuring several workers. The explosion at the SBL Energy Limited unit in Katol happened early morning, with more than 15 workers seriously injured. Some are feared dead, and others are trapped. Rescue operations are underway.
Web Summary : नागपुर के पास एसबीएल एक्सप्लोसिव्स में विस्फोट, कई श्रमिक घायल। काटोल में एसबीएल एनर्जी लिमिटेड इकाई में सुबह विस्फोट हुआ, 15 से अधिक श्रमिक गंभीर रूप से घायल। कुछ की मौत की आशंका, अन्य फंसे। बचाव कार्य जारी।