शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आणि ग्रामीणांच्या गरजांवर फोकस करून प्रयोग करावेत : अनुश्री मलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 22:56 IST

वस्तुस्थिती जाणून केलेले प्रयोग अधिक प्रभावी होतात आणि आम्हाला आदिवासी व ग्रामीण गरजांना ध्यानात ठेवून प्रयोग केले पाहिजेत, असे मत आयआयटी, दिल्ली येथील सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड टेक्नालॉजीच्या इन्स्टिट्यूट चेअर प्राध्यापक व प्रमुख अनुश्री मलिक यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देनीरीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विज्ञानाचे नाव आले तर प्रयोगशाळेचा उल्लेख होतो. प्रयोगशाळेत केवळ उपलब्ध नमुन्यांवर प्रयोग होतात. त्यामुळे विज्ञान केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता त्याबाहेरील विज्ञानावर लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही जे प्रयोग करीत आहोत त्याची समाज वा इंडस्ट्रीला गरज आहे का, हे पाहण्याची आवश्यकता आहे. वस्तुस्थिती जाणून केलेले प्रयोग अधिक प्रभावी होतात आणि आम्हाला आदिवासी व ग्रामीण गरजांना ध्यानात ठेवून प्रयोग केले पाहिजेत, असे मत आयआयटी, दिल्ली येथील सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड टेक्नालॉजीच्या इन्स्टिट्यूट चेअर प्राध्यापक व प्रमुख अनुश्री मलिक यांनी येथे व्यक्त केले.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थानमध्ये (नीरी) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जवाहर नवोदय विद्यालय, नवेगांव खैरीचे डॉ. जरीन कुरैशी, नीरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित, डॉ. जे.एस. पांडेय आणि प्रकाश कुंभारे उपस्थित होते.मलिक म्हणाल्या, प्रयोग करताना अनेकदा आम्हाला विफलता मिळते. परंतु निराश न होता पुढे जावे. त्यांनी सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड टेक्नालॉजीतर्फे करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. बायोगॅसवर कार चालविणे, वॉटरलेस युरिनल, महुआच्या फूलांपासून कॅन्डी तयार करणे, उत्पादनातून दुषित पदार्थ वेगळे करणे, बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित करणे, ८० टक्के वेस्टचा रियूज करणे आदींची माहिती दिली.डॉ. पुरोहित म्हणाले, यावर्षी ‘वुमन इन सायन्स’ ही विज्ञान दिनाची थीम आहे. समाजाच्या विकासात महिलांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांची उदाहरणे दिली. डॉ. पांडेय यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचालन एस. लांबा आणि प्रकाश कुंंभारे यांनी आभार मानले. या प्रसंगी नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.‘विज्ञान ज्योती’ प्रकल्पाचे उद्घाटनयाप्रसंगी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प ‘विज्ञान ज्योती’चे उद्घाटन करण्यात आले. डॉ. जरीन कुरैशी म्हणाले, भारत सरकारने महिला आणि विद्यार्थिनींमध्ये विज्ञानाची आवड आणि महिला व पुरुष वैज्ञानिकांचे प्रमाण समान करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केला आहे. त्याच्या संचालनाची जबाबदारी नवोदय विद्यालय समितीकडे दिली आहे. याअंतर्गत देशातील ५० जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूरचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून अकरावी विज्ञान इयत्तेतून ५० मुलींची निवड केली आहे.नवोदय विद्यालयात ५० विद्यार्थिनी नसल्यास तेथील केंद्रीय विद्यालय, केंद्र सरकारच्या शाळा आणि राज्य सरकारच्या शाळांमधून विद्यार्थिनींना निवडण्यात येणार आहे. दरवर्षीकरिता २० लाख रुपये प्रकल्पासाठी वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थिनीला एक हजार रुपये शिष्यवृत्ती आणि संशोधन कार्यासाठी एक हजार रुपये देण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत वर्षभर वैज्ञानिक, रोल मॉडेलची मुलाखत, एनजीओ, प्रयोगशाळांना भेट, संशोधन कार्य आणि पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

टॅग्स :scienceविज्ञानnagpurनागपूर