शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्टेशन कॉस्टच्या नावावर महागडे पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:50 IST

देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर नागपूर शहरात आहे. ५-७ पैशाची क्षुल्लक घट करण्यात आल्यानंतरही पेट्रोलची किंमत ८६ रुपयांवर आहे. व्हॅट, सेस व अन्य करांसोबतच एक आणखी कारण आहे, ज्यामुळे नागपूरकरांना पेट्रोलची जास्त किंमत मोजावी लागत आहे. पेट्रोल कंपन्या हा छुपा दर ट्रान्सपोर्ट कॉस्टच्या नावाने वसूल करीत आहे.

ठळक मुद्देवाहतूक खर्च कमी, तरीही तेल महाग : वेगवेगळ्या पंपांवर वेगवेगळे दर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर नागपूर शहरात आहे. ५-७ पैशाची क्षुल्लक घट करण्यात आल्यानंतरही पेट्रोलची किंमत ८६ रुपयांवर आहे. व्हॅट, सेस व अन्य करांसोबतच एक आणखी कारण आहे, ज्यामुळे नागपूरकरांना पेट्रोलची जास्त किंमत मोजावी लागत आहे. पेट्रोल कंपन्या हा छुपा दर ट्रान्सपोर्ट कॉस्टच्या नावाने वसूल करीत आहे. यासंदर्भात लोकमतने सर्वे केल्यावर असे निदर्शनास आले की, तीनही कंपन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात ४ ते ६ पैशाचे अंतर दिसून आले. आग्याराम देवी चौकातील एचपीचा पेट्रोल पंप, बैद्यनाथ चौकातील भारत पेट्रोल पंप, मेडिकल चौकातील इंडियन आॅईलच्या पेट्रोल पंपावर तफावत दिसून आली. यात एचपीसीएलचे पेट्रोल सर्वाधिक महाग होते.खापरी डेपो येथून तेलाचा पुरवठा बंद झाला आहे. इंडियन आॅईलच्या दहेगाव (अकोला) डेपोतून पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा होत आहे तर एचपीच्या पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा तडाळी (चंद्रपूर) डेपोतून होत आहे. तर बोरखेडी येथील डेपोतून भारत पेट्रोलियमचा पुरवठा होत आहे. तीनही कंपन्यांच्या ट्रान्सपोर्टेशन टेंडरमध्ये सर्वात महाग इंडियन आॅईलचे टेंडर आहे. त्यानंतरही हे पेट्रोल ‘एचपी’ कंपनीच्या पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे.टॅक्सचा बोजापेट्रोलियम पदार्थाचे दर ठरविताना सरकारने कुठलीही सूट दिली नाही. रस्त्याच्या नावावर वाहनचालक तीन प्रकारचा टॅक्स देत आहे. सेंट्रल रोड फंड १ रुपयावरून ८ रुपये करण्यात आला आहे. वाहन खरेदी करताना रोड टॅक्सच्या नावावर आरटीओमध्ये भरण्यात येत असलेल्या फीबरोबरच प्रत्येक नाक्यावर टोल टॅक्सच्या रूपातसुद्धा वसुली करण्यात येत आहे.किमतीवर लक्ष२०१७ मध्ये दैनिक मूल्य संशोधन नियमानुसार पेट्रोल कंपन्यांनी आपल्या हिशेबाने पेट्रोलच्या कि मती ठरविल्या आहेत. सोमवारी भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलचा दर ८६.२५ रुपये, इंडियन आॅईलचा दर ८६.२६ रुपये व एचपी पेट्रोलचा दर ८६.२९ रुपये होता.खासगी कंपन्यांचे पेट्रोल आणखी महागया तीन कंपन्यांबरोबरच शहरात दोन खासगी कंपन्यांचे पेट्रोल पंप आहेत. रिलायन्स व एस्सार या कंपन्यांच्या पेट्रोल पंपाला मुंबईतून पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा होतो. या दोन्ही कंपन्यांचे आसपास कुठलेही डेपो नाही. त्यामुळे या कंपन्यांची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणखी वाढते. बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल कंपन्यांपेक्षा रिलायन्सच्या पेट्रोलची किंमत किमान २० पैसे व एस्सारचे पेट्रोल २५ पैशांनी महाग आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलInflationमहागाई