शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
4
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
5
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
6
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
7
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
9
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
10
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
11
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
12
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
13
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
14
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
15
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
16
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
17
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
18
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
19
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
20
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचा विस्तार बाकाबार्इंमुळे झाला

By admin | Updated: April 17, 2016 03:14 IST

इतिहासकार अनेकदा संपूर्ण इतिहासाचे तथ्य न तपासता इतिहासाची मांडणी करीत असतात. पण त्यामुळे इतिहासात उणिवा निर्माण होतात.

मुधोजीराजे भोसले : ‘महाराणी बाकाबाई’ पुस्तकाचे प्रकाशननागपूर : इतिहासकार अनेकदा संपूर्ण इतिहासाचे तथ्य न तपासता इतिहासाची मांडणी करीत असतात. पण त्यामुळे इतिहासात उणिवा निर्माण होतात. काही इतिहास लेखनावर मी अनेकदा आक्षेप घेतला आहे. डॉ. भा. रा. अंधारे यांनी आतापर्यंत अनेक व्याख्याने आणि लेखन केले पण त्यांच्यावर आक्षेप घेण्याची वेळ कधीच आली नाही. या पुस्तकातूनही त्यांनी भोसले घराण्याचा संपूर्ण इतिहास अतिशय अभ्यासपूर्णतेने मांडला आहे. बाकाबार्इंमुळे नागपूरचा विस्तार झाला पण हे तथ्य आतापर्यंत समोर आले नाही. आज नागपूरचे जे विस्तारित स्वरूप दिसते आहे त्यात बाकाबार्इंचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मत राजे मुधोजी भोसले यांनी केले. द्वितीय रघुजींची तृतीय पत्नी बाकाबाई यांच्या चरित्राचे प्रकाशन शनिवारी करण्यात आले. इतिहास संशोधक डॉ. भा. रा. अंधारे यांनी ‘श्रीमंत महाराणी बाकाबाई साहेब भोसले’ या पुस्तकातून नागपूरच्या इतिहासातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन भरतनगर येथील दत्त मंदिरात ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, डॉ. श्रीकांत सोनटक्के, डॉ. गोविंद तिरमनवार, डॉ. भा. रा. अंधारे उपस्थित होते. मुधोजीराजे भोसले म्हणाले, राजघराण्यातील लोकांना नंतर विसरले जाते. आपण झाशीच्या राणीला ओळखतो पण भोसले घराण्याच्या कर्तृत्ववान स्त्री असलेल्या बाकाबार्इंना मात्र विसरतो. या पुस्तकाने ही उणीव दूर होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लक्ष्मणराव जोशी म्हणाले, समाजात काम करणाऱ्यांना आपण उचलून धरतो पण काही लोक कायम उपेक्षित राहतात. डॉ. अंधारे यांचे इतिहास संशोधन पुरंदरेंच्या तोडीचे आणि नागपूर-विदर्भासाठी अत्यंत मोलाचे आहे. विदर्भाच्या इतिहासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्यांचे संशोधन महत्त्वाचे असूनही त्यांना म्हणावे त्या प्रमाणात वैदर्भीयांनी उचलून धरले नाही. डॉ. अंधारे यांनी मात्र त्यांचे कार्य आणि संशोधन अव्याहतपणे सुरू ठेवले. इतिहासाचे संशोधन करणे हे क्लिष्ट काम आहे. त्यासाठी फार संयम लागतो. खरे बोलता येत नाही आणि खोटे सांगता येत नाही. अनेकदा दस्तावेज मिळत नाहीत. पण यातून मार्ग काढून त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे. राजेशाही संपली आणि लोकशाही आली. त्यात राजांचे अधिकार, पदेही संपुष्टात आलीत. पण भोसले घराण्याने मोठ्या मनाने लोकशाही मान्य केली. श्रीपाद अपराजित म्हणाले, इतिहासाबद्दल तोलून मापून बोलावे लागते. प्रत्येक घटनांची सत्यता तपासून त्यांचे संदर्भ लावणे हे कठीण काम आहे. या पुस्तकात बाकाबार्इंच्या नावाने मारबत काढण्यात आली, असा उल्लेख आहे. पोळ्याच्या दिवशी बाकाबार्इंचे निधन झाले, पण त्यानंतर ४० वर्षांनी मारबत काढण्यात आली. बाकाबार्इंना आजची पिढी ओळखतही नाही. आताच्या पिढीला कारगील युद्ध माहीत नाही त्यांना बाकाबाई कशी माहीत असणार. पण या पुस्तकाने तरुणाईला इतिहासाचे वेड लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या पुस्तकाच्या भूमिकेबद्दल सांगताना याप्रसंगी डॉ. गोविंद तिरमनवार संपादित ‘डॉ. भा.रा. अंधारे यांचे प्रस्तावना लेखन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. गोविंद तिरमनवार आणि डॉ. श्रीकांत सोनटक्के यांनीही मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दीप्ती अंधारे यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजू मिश्रा यांचा प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार लाभल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सर्वच अतिथींनी याप्रसंगी राजू मिश्रा यांच्या कार्याचा गौरव करून भविष्यातील त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. (प्रतिनिधी)