शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! नागपुरात सुखवस्तू कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 20:17 IST

कोराडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जगनाडे ले आऊटमध्ये राहणाऱ्या डॉक्टर पतीपत्नींनी आपल्या दोन मुलांसह गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना येथे उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देमुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय  कोराडी पंचक्रोशीत खळबळ 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्राध्यापक पती आणि डॉक्टर पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्यांच्या घरात आढळले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. १८) दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. धीरज राणे (४१), डॉ. सुषमा धीरज राणे (३९), ध्रव धीरज राणे (११) आणि वन्या धीरज राणे (५) अशी मृतांची नावे असून ते संत जगनाडे सोयायटी, ओमनगर, कोराडी नाका येथे राहत होते. धीरज राणे वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख तर डॉ. सुषमा या धंतोली, नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये नोकरी करायच्या. घरी धीरज यांची आत्या प्रमिला (६५) त्यांच्यासोबत राहायच्या.

भल्या सकाळी हे कुटुंब उठायचे. मंगळवारी सकाळी ९ वाजूनही भाचा, सून नातवांपैकी कुणीच बाहेर दिसत नसल्याने प्रमिला यांनी सुषमा यांना आवाज दिला. रात्री व्यवस्थित झोप झाली नाही, असे सुषमा हिने सांगितले. त्यानंतर १ वाजता पुन्हा प्रमिला यांनी आवाज दिला. यावेळी सुद्धा सुषमा यांनी अजून झोप झाली नाही, असे सांगितले. १.३० च्या सुमारास प्रमिला यांना त्यामुळे धीरजच्या रुमचे दार अर्धवट उघडे दिसल्याने त्या आतमध्ये गेल्या. धीरज, धुव्र आणि निपचित पडून होते. तर, बाजूच्या रूममध्ये सुषमा गळफास लावून दिसल्याने प्रमिला या आरडाओरड करीत बाहेर आल्या. त्यांनी बाजूच्या किराणा दुकान वर दुकानदाराला हे सांगितले. नंतर स्वत:च्या मुलीला आणि सुषमा यांच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षातही फोन केला. नियंत्रण कक्षाने कोराडी पोलिसांना कळविले. त्यानुसार ठाणेदार वजीर शेख आपल्या ताफ्यासह तेथे पोहोचले.

एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याचे कळल्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपयुक्त नीलोत्पल, गुन्हे शाखेची पथके तसेच ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक टीमही पोहोचल्या. धीरज, ध्रुव आणि वन्न्या या तिघांचे मृतदेह जेथे होते तेथे इंजेक्शनच्या दोन रिकाम्या सिरिंज आढळून आल्या. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या. एकूणच घटनाक्रमावरून राणे दाम्पत्यापैकी एकाने दोन मुलांसह तिघांची हत्या करून आत्महत्या केली असावी, असा संशय आहे

या घटनेची वार्ता वायुवेगाने कोराडी आणि आजूबाजूच्या गावात पोहोचली. त्यामुळे मोठ्या संख्येत बघ्यांनी राणे दांपत्याच्या निवासस्थानासमोर गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी सिरीनज आणि सुसाईड नोट सापडल्याचे सांगितले. यासंबंधाने जास्त माहिती देता येणार नाही, असे पोलीस अधिकारी म्हणाले. ऐन पोळ्याच्या दिवशी अत्यंत सुखवस्तू कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे पंचक्रोशीत उलट सुलट चर्चा केली जात आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्या