खळबळजनक! नागपुरात पत्नी व तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:56 IST2020-07-27T11:56:17+5:302020-07-27T11:56:35+5:30
आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या नवऱ्याने तिची व तिच्या कथित प्रियकराची चाकू हल्ला करून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना येथे रविवारी रात्री घडली.

खळबळजनक! नागपुरात पत्नी व तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या नवऱ्याने तिची व तिच्या कथित प्रियकराची चाकू हल्ला करून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना येथे रविवारी रात्री घडली. अजनी भागातील बाळकृष्ण नगरात ही घटना घडली असून आरोपी पती कुंवरलाल बरमया याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक वृत्त लवकरच देत आहोत..