खळबळजनक ! राहुल आग्रेकर अपहरण व हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 13:21 IST2017-12-01T13:17:35+5:302017-12-01T13:21:24+5:30
प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर अपहरण आणि हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने शुक्रवारी सकाळी छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

खळबळजनक ! राहुल आग्रेकर अपहरण व हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याची आत्महत्या
नागपूर- प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर अपहरण आणि हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने शुक्रवारी सकाळी छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. रायपूर शहरात गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळल्याचे वृत्त शहर पोलीसांना कळताच सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
२१ नोव्हेंबरच्या सकाळी ८.३० वाजता लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३७) यांचे अपहरण करून दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडेने त्यांना बुटीबोरीच्या चुहापेटी गावाजवळ नेले. तेथे बेशुद्ध केल्यानंतर राहुलची जिवंत जाळून हत्या करण्यात आली. बरीच धावपळ केल्यानंतर पोलिसांनी पंकज हारोडेला बुधवारी कोलकाता येथे अटक केली. तर, दुर्गेश तेथून पळून छत्तीसगडमधील रायपूरला आला. येथे त्याने दोन दिवस कसे बसे काढल्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. हे वृत्त रायपूर पोलिसांकडून नागपूर पोलिसांना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास कळल्यानंतर एकच खळबळ उडाली.