शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

ईव्हीएम संशयास्पद; बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात : राजू शेट्टी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 8:49 PM

लोकसभा निवडणुकीत देशभरातील २५० मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर जास्त मते मोजण्यात आली. काही मतमोजणी केंद्राच्या परिसरात वायफाय यंत्रणा नसताना मतमोजणीच्या वेळी सिग्नल दिसत होते. ईव्हीएम संदर्भात संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत. निवडणुका स्वच्छ व पारदर्शी वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. परंतु तक्रार करूनही आयोगाकडून शंकांचे निराकरण करण्यात आलेले नाही. पुढारलेल्या देशात ईव्हीएमचा वापर होत नाही. बॅलेटपेपरवर निवडणुका होतात. आपल्या देशातही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देदुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत देशभरातील २५० मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर जास्त मते मोजण्यात आली. काही मतमोजणी केंद्राच्या परिसरात वायफाय यंत्रणा नसताना मतमोजणीच्या वेळी सिग्नल दिसत होते. ईव्हीएम संदर्भात संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत. निवडणुका स्वच्छ व पारदर्शी वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. परंतु तक्रार करूनही आयोगाकडून शंकांचे निराकरण करण्यात आलेले नाही. पुढारलेल्या देशात ईव्हीएमचा वापर होत नाही. बॅलेटपेपरवर निवडणुका होतात. आपल्या देशातही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.मतमोजणीच्या वेळी विशिष्ट फेऱ्यापर्यंत आघाडीवरील उमदेवार नंतरच्या फेºयात अचानक मागे गेले. एका विशिष्ट मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झालेत. देशभरात सरकारविरोधात रोष असूनही युतीचे उमेदवार निवडून आले. यापुढील निवडणुकीतही अशीच परिस्थिती कायम राहिली तर लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहणार नाही. देशात अराजकता माजेल, अशी भीती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफडे, विदर्भ विभागाचे अध्यक्ष देवेंद्र भुयार, जिल्हा अध्यक्ष दयाल राऊ त, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बापुसाहेब करंडे आदी उपस्थित होतेशेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ‘एल्गार’ पुकारणारराज्यात दुष्काळाने रुद्रावतार धारण केला आहे. विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. गुरांचा चारा व पाणी मिळत नाही. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. दुसरीकडे टँकर माफियांनी हैदोस घातला आहे. २३ एप्रिलला मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरज होती. परंतु राज्य शासनाने बघ्याची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यक र्त्यांवर ३५३ कलमान्वये गुन्हे दाखल केले जात आहेत. शासनाच्या या दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघटना एल्गार पुकारणार आहे. यासाठीच विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.केंद्राच्या धोरणामुळे ऊ स उत्पादक संकटातऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी( फे अर रेम्युनरेटीव्ह प्राईस) अर्थात रास्त व किफायतशीर भाव न देणाऱ्या साखर कारखानदारावर शासनाने कारवाई करावी. यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून साखर आयुक्तांकडे वारंवार मागणी केली. वास्तविक एफआरपी न मिळण्याला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. राज्य सरकारने यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज आहे. परंतु सरकारचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.विरोधकांनी एकत्र यावेसरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याने संघटनेची भूमिका सरकार विरोधात आहे. भाजप-शिवसेना युतीचा पराभव करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकर घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMediaमाध्यमे