शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

दरवर्षी ४० हजार लोकांना बुबूळामुळे येते अंधत्व : अशोक मदान यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 8:55 PM

भारतात १२ लाख लोकांना बुबूळाचे अंधत्व आले आहे. दरवर्षी ४० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. यात ८० टक्के रुग्ण हे ५० वर्षांच्या आतील आहेत. यावर बुबूळ प्रत्यारोपण हाच एकउपचार आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून नेत्रदान पंधरवाडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबूळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. भारतात १२ लाख लोकांना बुबूळाचे अंधत्व आले आहे. दरवर्षी ४० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. यात ८० टक्के रुग्ण हे ५० वर्षांच्या आतील आहेत. यावर बुबूळ प्रत्यारोपण हाच एकउपचार आहे. नागपुरातील एकट्या मेडिकल रुग्णालयात दरवर्षी असे ६०वर नवे रुग्ण आढळून येतात, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातील (मेडिकल) नेत्र विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी येथे दिली.नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मेडिकलच्यावतीने २६ ऑगस्टपासून पंधरवाडा पाळला जात आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. मदान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, अंधत्व हे केवळ मोतीबिंदुमुळेच येते असे नाही, तर डोळयांना होणाऱ्या विविध आजारांमुळेही अंधत्व येऊ शकते. पारदर्शक पटल अपारदर्शक होणे हा आजार कोणत्याही वयाच्या म्हणजेच लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. अलिकडे मधुमेह, काचबिंदू, वाढते वय आणि बुबूळ खराब होऊन येणाऱ्याअंधत्वाचे प्रमाण वाढले आहे. यावर बुबूळ प्रत्यारोपण हा उपचार असलातरी, आवश्यक त्या प्रमाणात नेत्रदान होणे आवश्यक आहे, असेही डॉ. मदान म्हणाले. पत्रपरिषदेत डॉ. कविता धाबर्डे, डॉ. राजेश जोशी, डॉ. मिनल व्यवहारे व डॉ. स्नेहल बोंडे उपस्थित होत्या.देशात वर्षाला केवळ २८ हजार बुबूळ प्रत्यारोपणजगात ४५ दशलक्ष लोक अंध आहेत. भारतात याचे प्रमाण १७ दशलक्ष आहे. भारतात बुबूळामुळे आलेल्या अंधत्वाची संख्या १.२ दशलक्ष आहे. यातील बहुसंख्य रुग्णांवर बुबूळाचे प्रत्यारोपण करून अंधत्व दूर करता येऊ शकते. परंतु नेत्रदानाबाबतच्या उदासिनतेमुळे लोकांना आयुष्यभर अंधत्वात जीवन जगावे लागते. धक्कादायक म्हणजे, भारतात हजार लोकसंख्येत ७.३ टक्के लोकांचा मृत्यू होतो. परंतु दरवर्षी केवळ ५२ हजारच नेत्रदान होते. यातही विविध कारणांमुळे केवळ २८ हजार बुबूळ प्रत्यारोपण होते, अशी खंतही डॉ. मदान यांनी बोलून दाखवली.मेडिकलच्या नेत्ररोग विभागाला ऑगस्ट २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत १४० बुबूळ मिळाले. यात मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांकडून ८१ तर इतर नेत्र पेढीकडून ५९ बुबूळ मिळाले. परंतु सर्वच बुबूळ प्रत्यारोपणासाठी योग्य राहत नसल्याने ६५ रुग्णांवर बुबूळ प्रत्यारोपण करून नवी दृष्टी देण्यात आल्याचे डॉ. मदान यांनी सांगितले.मृत्यूनंतर नातेवाईकांना नेत्रदानाची माहिती देणे गरजेचेडॉ. मदान म्हणाले, मेयो, मेडिकल या शासकीय रुग्णालयांमध्ये दरदिवशी पाच ते सात रुग्णांचा विविध कारणांमुळे मृत्यू होतो. रुग्णाचे मृत्यू प्रमाणपत्र तयार करताना त्या फॉर्मवर नातेवाईकांना नेत्रदानाला संमती आहे किंवा नाही ते भरावे लागते. परंतु बहुसंख्य डॉक्टर त्याकडे दुर्लक्ष करतात. नातेवाईकांचे समुपदेशन केले जात नाही. नेत्रदान कमी होण्यासाठी हेही एक महत्त्वाचे कारण आहे.‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ वाढविणे गरजेचेएकीकडे नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक असताना बुबूळाच्या प्रत्येक स्तराचा वापर अंधत्व दूर करण्यास व्हायला हवा. वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ म्हटले जाते. बुबूळावर पाच स्तर असतात. यातील वरील दोन स्तर खराब झालेले असलेतरी उर्वरित दोन-तीन स्तराचा उपयोग अंधत्व दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. मेडिकलमध्ये गेल्या वर्षी १६ रुग्णांवर ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ करण्यात आली. परंतु यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची गरज आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण बुबूळ प्रत्यारोपणाच्या तुलनेत ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ शस्त्रक्रियेचा यशाचा दर दुप्पट आहे, असेही डॉ. मदान म्हणाले.चून्यामुळे वाढते अंधत्वतंबाखू खातांना त्यात मिसळविणाऱ्या चून्यामुळे अंधत्व आलेल्या रुग्णांची संख्या एकट्या मेडिकलमध्ये वर्षाला १२ च्यावर आहे. ‘अ‍ॅसीड’पेक्षाही चूना डोळ्यासाठी धोकादायक ठरतो.

  • नेत्रदानासाठी हे गरजेचे
  • नेत्रदानाविषयी व्यापक जनजागृती
  • नेत्रपेढी व नेत्र प्रत्यारोपण करणाऱ्यांमध्ये समन्वय असणे
  • एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बुबूळ उपलब्ध करून देण्याची सोय
  •  कॉर्निआ शल्यचिकित्सकांची पदभरती
  •  त्यांना लॅमीलर केरॅटोप्लास्टी’चे प्रशिक्षण देऊन शस्त्रक्रियेचे लक्ष्य देणे
  • बुबूळाची गरज असलेल्या रुग्णांची बायोमॅट्रिक करणे
  • पंचनाम्यापूर्वी बुबूळ काढण्यास परवानगी मिळणे
  • नेत्रदानात प्राप्त झालेले बुबूय यांचे योग्य वितरण होणे
टॅग्स :doctorडॉक्टरMediaमाध्यमे