एकटा स्वयंसेवकही पुन्हा नव्याने संघ सृष्टी निर्माण कर शकतो : मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 21:05 IST2020-03-07T21:04:18+5:302020-03-07T21:05:08+5:30
मा. गो. वैद्य यांच्या शतक शुभेच्या निमित्त जाहीर सत्कार

एकटा स्वयंसेवकही पुन्हा नव्याने संघ सृष्टी निर्माण कर शकतो : मोहन भागवत
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था नाही विचार आहे. त्यामुळेच संघाचे कुणी सदस्य नसतात. ते या संघ परिवाराचे घटक असतात. अश्या हजारो घटकांनी मिळून संघ बनला आहे. उद्या एखादी जादू झाली, आणि संघ परिवारातील सर्व परिवार गायब झाला, आणि केवळ एकच स्वयंसेवक उरला तरी तो एकटा स्वयंसेवक पुन्हा नव्याने संघसृष्टी निर्माण करू शकतो, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक मा.गो. वैद्य यांचा शतक शुभेच्छा समारोह निमित्त आज शनिवारी सुरेश भट सभागृहात सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. विलास डांगरे अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विशेष अतिथी होते.