शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

आला पाऊस जरी... ढगांशी नाते सांगत पतंग उडाले गगनावरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 22:17 IST

Nagpur News ढगाळ वातावरण व पावसाच्या लहरी सरी यांच्यावर मात करून नागपुरातील तरुणाईने आपला पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

ठळक मुद्देदुपारनंतर बच्चे कंपनी, तरुणांचा जल्लोष कुडकुडत्या गारठ्यात तिळगूळ, डीजे संगीताने भरला जोश

नागपूर : मकरसंक्रांतीला तिळगूळ खाऊन गोडगोड बोलण्याची जशी लगबग घरोघरी असते, पूजापाठाचे नैमित्यिक विधी उरकून एकमेकांना शुभेच्छा देण्याचा जसा उत्साह असतो अगदी तसाच जल्लोष सूर्योदयापासून आकाशात आपल्या रंगीबेरंगी पतंग उडविण्याचा बच्चेकंपनीपासून ते तरुण आणि इतर वयोगटातील नागरिकांमध्येही असतो. शुक्रवारी संक्रांतीच्या पर्वालाही अगदी तीच लगबग, उत्साह आणि जल्लोष दिसत होता. मात्र, सकाळपासूनच ढगांच्या गर्दीने, पावसाच्या रिपरिपीने त्यावर विरजण टाकण्याचे प्रयत्न केले. मात्र, विरजण पडेल तो संक्रांतीचा पतंगोत्सव कसला... पावसाने दुपारी उघडीप घेताच आकाशात ढगांशी नाते सांगत रंगीबेरंगी पतंगांचा पूर उसळला होता.

सध्या कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटात नागपूरकर असल्याने, उत्सवाबाबत कोरोना निर्देश शासनाने जारी केले आहेत. अशा स्थितीत संक्रांतीला साजरा होणारा पतंगोत्सव प्रचंड चिंतेचा विषय बनला होता. शिवाय, नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा विषयही महत्त्वाचा होता. या सगळ्यांचा अर्धाअधिक भार पावसाने वहन केल्यामुळे, पोलीस व स्थानिक प्रशासनालाही संक्रांतीच्या सणाला तितकीशी धावपळ करावी लागली नाही. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने सकाळपासून नीरस बसलेल्या तरुणाईमध्ये उत्साह संचारला. त्याअनुषंगाने लगोलग मैदानात, छतांवर गलका जमायला लागला. सोबत डीजेची व्यवस्था करण्यात आली आणि लोकप्रिय गाण्यांचा नाद व्हायला लागला. सोबतीला घरोघरी तयार झालेल्या तिळगुळासोबत चिवड्यावर ताव मारण्यास सुरुवात झाली. या सगळ्यात मोठा नाद होता तो ‘ओ.. काट’च्या जयघोषाचा. संध्याकाळपासून हा जल्लोष सर्वत्र दिसून येत होता आणि संक्रांती पर्व पतंगोत्सवाने साजरा झाले.

इतवारी दही बाजार पुलावर गलका

दुपारनंतर इतवारी येथील दही बाजार उड्डाणपुलावर पतंग शौकिनांचा गलका जमला होता. संक्रांतीला उडणाऱ्या पतंगांमुळे आणि मांजामुळे कुणाला दुखापत होऊ नये म्हणून शहरातील सर्व उड्डाणपूल दळणवळणासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यासाठी बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. मात्र, या सगळ्या निर्बंधाला न जुमानता तरुण, बच्चे कंपनी सर्रास एकत्र आले होते.

मांजाच्या धास्तीने दुचाकीस्वार चौकस

नायलॉन मांजाच्या जीवघेण्या करामतीमुळे रस्तोरस्ती धावणाऱ्या दुचाकींचा वेग आपसूकच कमी झालेला दिसत होता. एरवी भरधाव धावणारी वाहने सगळीकडे दिसतात. मात्र, शुक्रवारी सगळेच जणू वेग मर्यादा पाळत असल्याचे जाणवत होते.

मांजा आडवा येताच नागरिकही सजग

दुपारनंतर पतंग उडायला लागल्याने कटलेल्या पतंगांचा मांजा रस्त्यावर आडवा येत होता. अनेक दुचाकीस्वार यामुळे अडखळत होते. अशी स्थिती दिसताच आजूबाजूला असणारे नागरिक लगेच मांजा बाजूला करण्यासाठी मदत करत होते. अनेक ठिकाणी पोलिसांनीही मांजाच्या अडथळ्यात सापडलेल्या नागरिकांना सोडवले.

...............

टॅग्स :kiteपतंगMakar Sankrantiमकर संक्रांती