शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अन्ननलिकेचा कर्करोग, श्वसनमार्गात छिद्र, तरीही वाचला जीव

By सुमेध वाघमार | Updated: June 3, 2024 17:48 IST

डॉक्टरांना यश : बॉन्कोस्कोपीद्वारे स्टेन्टिंगची प्रकिया केली यशस्वी

नागपूर: श्वसनमार्गामध्ये छिद्र आणि अन्ननलिकेमधील वाढत्या कर्करोगामुळे श्वसनमार्गावर पडणारा दबाव अशा जीवघेण्या परिस्थितीशी झगडत असणाºया एका वृद्ध  रुग्णावर ‘बॉन्कोस्कोपी’द्वारे ‘स्टेन्टिंग’ची प्रकिया यशस्वीरीत्या पार पडली. परिणामी रुग्णाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.   

फुफ्फुसाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या मध्यप्रदेशमधून ६९ वर्षीय रुग्ण नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले. रुग्णाला ‘सीओपीडी’ आणि दीर्घकालीन दम्याचा त्रास असल्याचे निदान झाले. पूर्वी झालेल्या संक्रमित आजारामुळे फुफ्फुसात बºयाच प्रमाणात पाणी जमा झाले होते. यासह रुग्णाला अन्ननलिकेचा दुर्धर कर्करोग झाला होता. ज्यासाठी यापूर्वीच रुग्णाच्या अन्ननलिकेमध्ये स्टेन्टिंग देखील करण्यात आले होते. परंतु,  कर्करोगाचे अन्ननलिकेमधील संक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात होते कि त्याच्या श्वसनमार्गावर दबाव पडत होता. परिणामी, श्वसनमार्गामध्ये छिद्र पडले होते. यामुळे रुग्णाला श्वास घेणे कठीण जात होते. तातडीने उचपार न केल्यास जीवास धोका होता. 

छिद्र झाकताच श्वासोच्छवासात फरकअशा गुंतागुंत परिस्थितीत वरिष्ठ श्वसनरोग तज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्यासह श्वसनरोग तज्ञ डॉ. परिमल देशपांडे आणि डॉ. स्वप्नील बाकमवार यांनी श्वसनमार्ग स्वच्छ करून मोकळा केला. स्टेन्टिंग प्रक्रियेद्वारे छिद्र झाकून टाकण्याचा मार्ग निवडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक नियोजनाद्वारे ही प्रकिया यशस्वीरीत्या पार पाडली. ज्यामुळे रुग्णाच्या श्वासोच्छवासात लक्षणीय फरक पडला. रुग्णाचा श्वासोच्छवास पूर्ववत झाल्यावर त्याच दिवशी सुटी देण्यात आली. या प्रक्रियेत चिरा मारण्यात येत नाही.

परिणामकारक उपचार प्रक्रिया  डॉ. अरबट म्हणाले, श्वसनमार्गाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या, श्वसनमार्गामध्ये छिद्र असलेल्या रुग्णांकरिता ब्रोन्कोस्कोपी आणि स्टेन्टिंग ही अत्यंत परिणामकारक उपचार प्रक्रिया आहे. आजवर मध्यभारतातील अनेक रुग्णांच्या श्वासाचे पुनर्वसन करण्यात ही प्रक्रिया यशस्वी ठरली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोगCancer Awarenessकॅन्सर जनजागृतीnagpurनागपूर