संतापलेल्या जावयाने केला सासूवर जीवघेणा हल्ला; पत्नीपासून दूर केल्याचा राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 22:18 IST2021-11-03T22:18:08+5:302021-11-03T22:18:37+5:30

Nagpur News सदरच्या नवी वस्तीतील एका युवकाने पत्नीपासून दूर केल्याच्या संशयापोटी सासूवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

Enraged Javanese fatal attack on mother-in-law; Anger at being separated from wife | संतापलेल्या जावयाने केला सासूवर जीवघेणा हल्ला; पत्नीपासून दूर केल्याचा राग

संतापलेल्या जावयाने केला सासूवर जीवघेणा हल्ला; पत्नीपासून दूर केल्याचा राग



नागपूर : सदरच्या नवी वस्तीतील एका युवकाने पत्नीपासून दूर केल्याच्या संशयापोटी सासूवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सासूचे नाव अंतकला विनोद मेश्राम (४८) आहे.

अंतकलाचा मुलगा पुण्यात इंजिनिअर आहे. ती मुलगी तृप्तीसोबत राहते. तृप्तीचा २०१५मध्ये नारा येथील धर्मेंद्र साहू याच्याशी प्रेमविवाह झाला होता. धर्मेंद्र तृप्तीला त्रास देत होता. तृप्तीची नोकरी करण्याची अपेक्षा होता. परंतु, तो तिला नोकरी करण्यापासून थांबवत होता. त्यामुळे त्रस्त होऊन तृप्ती २०१७मध्ये आईकडे राहायला आली. काही महिन्यानंतर धर्मेंद्रसुद्धा सासरी राहायला आला.

परंतु, त्याच्या वागणुकीमुळे सासूने त्याला घराबाहेर काढले. बुधवारी दुपारी धर्मेंद्र अंतकलाचा खून करण्याच्या मानसिकतेने तिच्या घरी पोहोचला. त्याने तृप्तीसंदर्भात विचारणा केली. तृप्ती वर्धा येथे नातेवाईकांच्या घरी राहत असल्याचे अंतकलाने सांगितले. त्यामुळे धर्मेंद्र संतप्त झाला व त्याने सासूच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकली. त्यानंतर चाकूने हल्ला केला. अंतकलाने आरडाओरडा केल्याने शेजारी मदतीला पोहोचले. त्यांना बघून धर्मेंद्र फरार झाला. सदर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपी धर्मेंद्रचा शोध घेत आहेत.

Web Title: Enraged Javanese fatal attack on mother-in-law; Anger at being separated from wife