ऑस्ट्रेलियाला मागे टाकून इंग्लंडची अव्वल स्थानी झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST2020-12-04T04:23:41+5:302020-12-04T04:23:41+5:30

खेळाडूंच्या रॅंकिंगबाबत इंग्लंडचा डेव्हिड मलान नंबर वन बनला. बाबर आझम दुसऱ्या, ॲरोन फिंच तिसऱ्या आणि लोकेश राहुल चौथ्या स्थानावर ...

England tops the list, overtaking Australia | ऑस्ट्रेलियाला मागे टाकून इंग्लंडची अव्वल स्थानी झेप

ऑस्ट्रेलियाला मागे टाकून इंग्लंडची अव्वल स्थानी झेप

खेळाडूंच्या रॅंकिंगबाबत इंग्लंडचा डेव्हिड मलान नंबर वन बनला. बाबर आझम दुसऱ्या, ॲरोन फिंच तिसऱ्या आणि लोकेश राहुल चौथ्या स्थानावर आहे. विराट कोहली नवव्या आणि रोहित शर्मा दहाव्या स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या यादीत राशीद खान पहिल्या आणि मुजीब उर रहमान दुसऱ्या स्थानावर आहे. हे दोन्ही खेळाडू अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज आहेत. टी- २० गोलंदाजांमध्ये पहिल्या दहा स्थानांवर एकही भारतीय खेळाडू नाही. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही अव्वल स्थानावर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी असून दुसऱ्या स्थानावर बांगला देशचा शाकिब अल हसन आहे. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल असून या यादीतही एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही.

आयसीसी टी-२० टॉप फलंदाज

डेव्हिड मलान,इंग्लंड, बाबर आझम, पाकिस्तान ,ॲरोन फिंच, ऑस्ट्रेलिया, लोकेश राहुल, भारत, वॉन डर दुसेन द. आफ्रिका.

मलानची ऐतिहासिक कामगिरी

इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान याने टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमासह ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याचे रॅंकिंगमध्ये सर्वाधिक गुण आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरोन फिंच आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंना मागे टाकले. द.आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात मलानने हा विक्रम केला. त्याने ४७ चेंडूत ९९ धावांचा धडाका केला. यामुळे इंग्लंडने नऊ गडी राखून सहज विजय नोंदवला. या खेळीमुळे त्याने आयसीसी क्रमवारीत ९१५ गुण झाले. हा विक्रम आधी फिंचच्या नावावर होता. २०१४ ला विराट कोहलीने ८९७ गुणांपर्यंत मजल गाठली होती. सध्या कोहलीचे ६७३ गुण असून तो नवव्या स्थानी आहे.

टॉप फाईव्ह मध्ये केवळ एक बदल

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीेत पहिल्या चार स्थानांवरील खेळाडू कायम आहेत. मलानपाठोपाठ पाकचा बाबर आझम असून तिसऱ्या स्थानावर फिंच आणि चौथ्या स्थानावर लोकेश राहुल असून पाचव्या स्थानी वॉन डर दुसेन याची एंट्री झाली. त्याने अखेरच्या सामन्यात ३२ चेंडूत ७४ धावा ठोकल्या होत्या.

Web Title: England tops the list, overtaking Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.