टीआरएसला नमवून अभियांत्रिकीने जिंकला रेल्वे डीआरएम चषक
By नरेश डोंगरे | Updated: May 31, 2024 20:22 IST2024-05-31T20:22:15+5:302024-05-31T20:22:25+5:30
अंतिम सामना गुरुवारी टीआरएस विरुद्ध अभियांत्रिकी विभागाच्या संघात झाला.

टीआरएसला नमवून अभियांत्रिकीने जिंकला रेल्वे डीआरएम चषक
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीआरएसच्या संघाला नमवून अभियांत्रिकी संघाने रेल्वे डीआरएम चषक जिंकला. २८, २९ आणि ३० मे अशा तीन दिवसांत पार पडलेल्या या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत रेल्वेच्या विविध विभागाचे ८ संघ सहभागी झाले होते.
लिग कम नॉकआउट या पद्धतीने हे सामने खेळविण्यात आले. अंतिम सामना गुरुवारी टीआरएस विरुद्ध अभियांत्रिकी विभागाच्या संघात झाला.
दोन्ही संघाकडून अत्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन होत असल्याने अखेरपर्यंत हा सामना चुरस वाढवित गेला. शेवटी निर्णायक शॉट लगावत अभियांत्रिकी संघाने २-१ च्या फरकाने हा सामना जिंकला.
स्पर्धेत मॅन ऑफ द सिरिजचा खिताब अभियांत्रिकी संघाचा आशिष केणे याने मिळवला तर आक्रमक खेळाचे प्रदर्शन करून टीआरएसच्या श्रवणने उत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. टीआरओ संघाचे राजेंद्र कुमार सिंग, ओपीटीजीचे एम. डी. परवेज यांनीही काैशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करून व्यक्तीगत पुरस्कार मिळवले.
पुरस्कार वितरण समारंभात एडीआरएम पी. एस. खैरकर यांनी सहभागी संघ आणि सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दलही त्यांनी परिश्रम घेणारांचे काैतक केले.