नागपुरात टिप्परच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 21:35 IST2021-06-05T21:34:55+5:302021-06-05T21:35:27+5:30
Engineer killed in tipper collision भरधाव टिप्परने जोरदार धडक दिल्यामुळे एका अभियंत्याचा करुण अंत झाला.

नागपुरात टिप्परच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भरधाव टिप्परने जोरदार धडक दिल्यामुळे एका अभियंत्याचा करुण अंत झाला. पंकज मधुकर कुर्वे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. नाईकवाडी बांगलादेश परिसरात राहणारा पंकज एका कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे सेल्स ॲन्ड सर्व्हिसची जबाबदारी होती. तो आणि त्याचा सहकारी अभियंता राहुल सीताराम सोनकुरे (वय ३९, रा. जागृती कॉलनी, काटोल रोड) हे दोघे आपापल्या दुचाकीने कंपनीची प्लाझ्मा कटिंग मशीन घेऊन शुक्रवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास ऑरेंजसिटी हॉस्पिटल ते सावरकरनगर रोडने जात होते. एमएच ४०-सीडी ०५९७ क्रमांकाचा टिप्परचालक आरोपी जावेद गफ्फार शहा (वय ३०, रा. खापा) याने पंकजच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे त्याचा करुण अंत झाला. राहुल सोनकुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी टिप्परचालक आरोपी जावेद शहाविरुद्ध गुन्हा दाखल केला.