शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

महाराष्ट्रातील पक्ष्यांचा मराठी पक्षिकाेश तयार हाेणार; ५७७ पक्ष्यांची इत्थंभूत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 07:00 IST

Nagpur News महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या प्रयत्नातून राज्यभरातील १००-१५० पक्षिमित्रांनी एकत्रित येत पक्षिकाेश तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे.

निशांत वानखेडे

नागपूर : आजघडीला पक्ष्यांची माहिती सांगणारी बरीच पुस्तके मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. मात्र या सर्व पक्ष्यांची इत्थंभूत अशी एकत्रित माहिती देणारे पुस्तक नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या प्रयत्नातून राज्यभरातील १००-१५० पक्षिमित्रांनी एकत्रित येत पक्षिकाेश तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. या विश्वकाेशामध्ये ५७७ पक्ष्यांची सविस्तर माहिती मराठीतून उपलब्ध केली जाणार आहे. (Encyclopedia of brds in Maharashtra  will be ready; Essential information of 577 birds)

बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री साेसायटीच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात ५७७ प्रजातींचे पक्षी आहेत. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे ‘पक्षिकोश’ हे पुस्तक मराठीतील एक अनमोल खजिनाच आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष्याची थोडक्यात माहिती आणि विविध प्रांतातील आणि भाषेतील त्यांची नावे दिलेली असून, हा ग्रंथ पक्ष्यांविषयीच्या माहितीचा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. हा खराेखर दुर्मिळ असा ठेवा आहे. मात्र नव्या पक्षिकाेशामध्ये पक्ष्यांच्या जन्मापासून महत्त्वाच्या घडामाेडींची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गाेंदियाचे अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या संकल्पनेतून हा पक्षिकाेश साकार हाेत आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष व मराठी पक्षिकाेश संपादक मंडळाचे सदस्य डाॅ. जयंत वडतकर यांनी सविस्तर माहिती दिली. प्रत्येक पक्ष्याचे वास्तव्य कुठे, स्थानिक की स्थलांतरित, त्याचे घरटे कसे, प्रजननाचा काळ, पिल्ले कधी हाेतात, ताे दिसताे कसा, त्याचा आवाज कसा असताे अशी सगळी माहिती सहज साेप्या मराठी भाषेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न या पक्षिकाेशातून केला जात आहे. हा खऱ्या अर्थाने प्रत्येक पक्ष्याचा मराठीतील विकिपीडिया ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरी, ग्रामीण, तलावावरच्या, माळरानावरच्या, जंगलातील अशा सर्व पक्ष्यांची माहिती त्यात असेल. ही सर्व माहिती एका पुस्तकात सामावणार नाही, त्यामुळे किमान तीन खंड हाेण्याची अपेक्षा डाॅ. वडतकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील सर्व पक्षिमित्रांना या पक्षिकाेशासाठी माहिती संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले हाेते. यामध्ये प्रत्येक पक्ष्यावर लिहिण्याची तयारी अनेक पक्षिमित्र, अभ्यासक यांनी दर्शविली आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र पक्षिमित्र व संघटनेचे अनेक सभासदसुद्धा सहकार्य करणार असून सर्वांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.

स्थानिक पक्षिमित्रांच्या अभ्यासावर आधारित हा पक्षिकाेश असणार आहे. मराठीत सर्व पक्ष्यांची एकत्रित माहिती असल्याने ताे सर्वांना आपला वाटेल. याद्वारे महाराष्ट्रातील सर्व पक्ष्यांची नाेंद हाेईल आणि सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही त्यांचा अभ्यास करण्यास लाभदायक ठरेल.

- डॉ जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षिमित्र

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य