शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

एम्प्रेस मॉल असुरक्षित!

By admin | Updated: February 11, 2015 02:29 IST

खरेदीसाठी किंवा विरंगुळा म्हणून वेळ घालविण्यासाठी आपण शहरातील आलिशान एम्प्रेस मॉलमध्ये जाण्याच्या विचारात असाल तर सावधान!

नागपूर : खरेदीसाठी किंवा विरंगुळा म्हणून वेळ घालविण्यासाठी आपण शहरातील आलिशान एम्प्रेस मॉलमध्ये जाण्याच्या विचारात असाल तर सावधान! एम्प्रेस मॉलला महापालिकेच्या अग्निशमन विभागाने असुरक्षित घोषित केले आहे. या इमारतीत आग लागण्याचा तसेच आपातकालीन परिस्थिीतीत नागरिकांचा जीव जाण्याचा धोका होऊ शकतो. या संबंधी सचेत करणारे पत्र अग्निशमन विभागाने २१ जानेवारी २०१५ रोजी एम्प्रेस मॉलला पाठविले आहे. गांधीसागर परिसरात के.एस.एल. इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे ‘एम्प्रेस सिटी’चे बांधकाम सुरू आहे. यातच ‘एम्प्रेस मॉल’ बांधण्यात आला आहे. या मॉलमध्ये दाखविण्यासाठी अग्निशमन उपकरणे लावण्यात आली आहे. मात्र, ती सुरू आहेत की नाही याचे प्रमाण ते अद्याप अग्निशमन विभागाला देऊ शकलेले नाहीत. विशेष म्हणजे अग्निशमन विभागाने मॉलला पत्र लिहून अग्निशमनसाठी काय उपाय योजले आहेत, अशी विचारणा केली होती. मात्र, आजवर मॉलने या संबंधीचा अहवाल महापालिकेला सोपविलेला नाही. संबंधित प्रकरणी २७ मार्च २०१४, ४ एप्रिल २०१४, २६ डिसेंबर २०१४ व २१ जानेवारी २०१५ रोजी अग्निशमन विभागाने मॉलला पत्र पाठविले आहे. या मॉलमध्ये एकदा आग लागली असता त्याचे मूळ शोधण्यात दीड तासाहून अधिक वेळ लागला होता. त्यावेळी आगीची माहिती अग्निशमन विभागाला न देता मॉल प्रशासने स्वत:च आग विझविण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यात यश येत नसल्याचे लक्षात येताच नंतर उशिरा अग्निशमन विभागाला कळविण्यात आले होते. (प्रतिनिधी)