बांधकाम व हॉस्पिटलच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:40 AM2017-09-01T01:40:52+5:302017-09-01T01:41:08+5:30

नागपुरात कन्स्ट्रक्शन व हॉस्पिटल या क्षेत्रामध्ये रोजगाराची वाढती मागणी आहे. तसेच वाहन चालकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.

Employment Opportunities in Construction and Hospital Areas | बांधकाम व हॉस्पिटलच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी

बांधकाम व हॉस्पिटलच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक : वाहन चालकांचीही आवश्यकता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कन्स्ट्रक्शन व हॉस्पिटल या क्षेत्रामध्ये रोजगाराची वाढती मागणी आहे. तसेच वाहन चालकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. परंतु पाहिजे तसे कर्मचारी या क्षेत्रात उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कौशल्य विकासांतर्गत युवकांना या क्षेत्रातील आवश्यक कामांचे प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. अशी माहिती खासदार डॉ. विकास महात्मे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली रविभवन येथे पार पडली. यावेळी आमदार गिरीश व्यास, आमदार समीर मेघे, विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य माजी आमदार मधुकर किंमतकर, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, विदर्भ इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती उकेश चव्हाण, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके उपस्थित होते.
प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील युवकांना विविध अभ्यासक्रमाचे (कोर्सेस)े शिक्षण देण्यात येत आहे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळत आहे. कौशल्य विकासांतर्गत नाविन्यपूर्ण कोर्सेसचे शिक्षण देऊन जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी यावेळी सांगितले. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या कोर्सेसव्यतिरिक्त अन्य नाविन्यपूर्ण रोजगाराभिमुख कोर्सेस सुद्धा विविध विभागांनी सुचवावे, असेही खासदार डॉ. महात्मे यांनी सांगितले. शासनाच्या विविध विभागामार्फत आॅटोमोटीव्ह रिपेअर, बँकिंग अँड अकाऊटिंग, कन्स्ट्रक्शन, कुरिअर अँड लॉजिस्टिंग, इलेक्ट्रीकल, फॅब्रिकेशन, गारमेंट मेकिंग, हॉस्पिटॅलिटी, मेडिकल अँड नर्सिंग यासारख्या विविध कोर्सेसचे शिक्षण देण्यात येत असून त्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देण्यात येत आहे. याबाबत जिल्ह्यातील संबंधित विभागाने केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.
मनपातर्फे ९९५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
महानगरपालिकेच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजने अंतर्गत ९९५ विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग पूर्ण केले आहे. त्यामधील २९४ जणांना कॅम्पसद्वाारे विविध क्षेत्रामध्ये रोजगार मिळाला आहे. सद्यस्थितीत ९६० लाभार्थी ट्रेनिंग घेत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
राज्यातील पहिलीच समिती
नागपूर शहर व जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती स्थापन केली. ही राज्यातील अशी पहिलीच समिती आहे. या समितीची गुरुवारी पहिली बैठक पार पडली. त्यात विविध विषयावर चर्चा झाली.
बीड व ठाण्यातील कामांची होणार पाहणी
कौशल्य विकास अंतर्गत बीड आणि ठाणे जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. तेथील कामांची पाहणी त्याचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन सादर करण्याच्या सूचनाही या बैठकीत अधिकाºयांना देण्यात आल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

Web Title: Employment Opportunities in Construction and Hospital Areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.