इंडिगोची इमर्जन्सी लॅण्डिंग; प्रवाशाला आला हृदयविकाराचा झटका
By नरेश डोंगरे | Updated: March 17, 2023 22:54 IST2023-03-17T22:53:48+5:302023-03-17T22:54:13+5:30
Nagpur News विमानातील प्रवाशाला हृदयविकाराचा धक्का आल्याने रांचीहून पुण्याकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाची आज नागपुरात इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आली.

इंडिगोची इमर्जन्सी लॅण्डिंग; प्रवाशाला आला हृदयविकाराचा झटका
नागपूर : विमानातील प्रवाशाला हृदयविकाराचा धक्का आल्याने रांचीहून पुण्याकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाची आज नागपुरात इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आली.
इंडिगो एअरलाइन्सचे ६-ई ६७२ हे विमान गुरुवारी रात्री रांचीहून पुण्याकडे जात होते. या विमानात प्रवास करणारे प्रभुदयाल शर्मा (७३) यांचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यांना हृदयाचा धक्का बसला. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. यामुळे सहप्रवासी घाबरले. त्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. त्यामुळे त्यांनी पायलटला ही बाब सांगून नागपूर विमानतळावर विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गुरुवारी रात्री १०.४८ वाजता हे विमान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. येथील किम्स-किंग्सवे या खासगी रुग्णालयात शर्मा यांना नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.